माजी आमदार स्व.मधुकर ठाकूर यांचा प्रथम स्मृतीदिन सातीर्जे येथे भावपूर्ण वातावरणात साजरा
सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆
समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले समाज सुधारक, दीनदुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करणारे बहुजनाच्या हृदयात देवमाणसाचे स्थान असलेले समाजनेते व अलिबाग-उरण तालुक्याचे कॉंग्रेसचे माजी आमदार स्व.मधुकर ठाकूर यांचा प्रथम स्मृतीदिन सातीर्जे या त्यांच्या मुळ गावी भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यांत आला.

जिल्हयातील कॉंग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य नागरिकांची याप्रसंगी मोठया प्रमाणावर उपस्थिती होती. स्व.मधुकर ठाकूर यांच्या पुतळयाचे अनावरण यावेळी त्यांच्या नातवंडांच्या हस्ते करण्यांत आले.
ठाकूर कूटूंबीयांतर्फे प्रदेश कॉंग्रेसचे चिटणीस ऍड.प्रविण ठाकूर, रविंद्र उर्फ काका ठाकूर, कॉंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाउ ठाकूर, रविनाना ठाकूर, ऍड.उमेश ठाकूर, समीर ठाकूर, अमीर ठाकूर,प्रसाद थळे यांनी उपस्थित नेते, कार्यकर्ते व नागरिकांचे यावेळी स्वागत केले.

मधुशेठ ठाकूर यांचे एक वर्षापूर्वी त्यांच्या वाढदिवशीच निधन झाले होते. आपल्या लाडक्या नेत्याच्या स्मृतीला अभिवादन करण्या त्यांच्या वाढदिवसानिमीत्त दरवर्षी होणारी गर्दी त्यांच्या स्मृतीदिनीही झाली होती. सर्वसामान्य जनतेमध्ये स्व.मधुषेठ ठाकूर यांच्या विषयी असलेले प्रेम कायम असल्याचे पाहून ठाकूर कुटूंबीय भारावून गेले होते.
महाराष्ट्र कॉंग्रेसचे नेते माजी आमदार मुश्ताकभाई अंतुले, आर.सी.घरत, ऍड.जे.टी.पाटील, चंद्रकांत पाटील, सुनील थळे, अनंतराव गांधळी, हर्षल पाटील, योगेश मगर, सुभाष महाडीक, प्रीतम पाटील, सुदेश वाणी, कृष्णा अंबाजी, कृष्णा भोपी, मुजफर मोदी, नदीम बेबन, रणजीत राणे, पी.पी.खारपाटील, डॉ.चंद्रकांत जगताप, प्रभाकर राणे, मच्छींद्र पाटील,ज.गो.पाटील, बाबुराव पाटील, भास्कर भोपी, मनोहर म्हात्रे, महेश पडते, आकाश राणे, तोडणकर गुरूजी, प्रशांत गावंड, प्रकाश पाटील, सुचीत थळे, चंद्रकांत खोत, विवेक जोशी यांच्यासह मोठया प्रमाणावर लोकांनी स्व.मधुशेठ ठाकूर यांच्या स्मृतीस्थळी जावून त्यांना आदरांजली वाहिली.







Be First to Comment