Press "Enter" to skip to content

तालुक्यात पावसाचा “थरथराट”

रस्ते जलमय, वहातूकीची कोंडी, लागवडीच्या कामाला ब्रेक, शेतातील राब वाहून जाण्यांची भीती

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

गेले अनेक दिवस पाऊस रौद्र रुप धार्ण करुन तांडव करीत असल्यामूळे जनजीवन विस्कळीत होत.असून तालुक्यांचे सर्वच रस्ते जलमय होत आहे. गेले अनेक दिवस पावसाचे आगमन होत असल्यामूळे क्षणभर विश्रांती ही बळीराजा सह अनेकांसाठी पर्वणी वाटत असे.अवघ्या काही मिनिटांची पाऊस उसंत घेत आहे.मात्र गुरुवार पासून बरसत असलेल्या पावसाने अवघ्या तालुक्यातील जनजीवन विस्कळीत केले. ग्रामिण भागातही धो-धो पाऊस बरसत असल्याने गुडघाभर पाणी शेतात साचून राहिल्याने लागवड चा खेळखंडोबा झाला आहे.त्याच बरोबर पावसाचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे वाहतूकीची कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

पाताळगंगा नदिने धोक्यांची पातळी ओलांडली दिसत आहे. तर दुसऱ्या छायाचित्रात धोक्याची पातळी ओलंडू नका सांगणारी तरुण वर्ग

भातशेती ही पूर्ण पाण्याखाली गेली आहे.तर शेतात उपटलेले राब या पाण्याच्या प्रवाहाने वहात जात असल्यामूळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे .तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर भातशेती करण्यात येत असल्यामूळे भाताचे विक्रमी उत्पादन तालुक्यात घेतले जाते.जुलै च्या दुस-या आठवड्यात भात लागवड पुर्ण होते मात्र या वर्षी वेळेवर पावसाचे आगमन न झाल्यामूळे राब तयार होण्यास विलंब झाला मात्र लागवड सुरू झाली असताना पावसाचा झिंगाट सुरु झाले.यामूळे बळीराजा चांगलाच धास्तावला आहे. असून लागवड पुर्ण करण्यासाठी बळीराजांन कंबर कसली आहे.लागवड पुर्ण झाली तर पुढचे पिक येण्यांस विलंब लागत नाही.

त्यातच पावसामूळे रस्त्यांची दुरवस्था निर्माण होवून वाहतूकीची कोंडीची समस्या डोके वर काढत आहे. तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेती, लहान नाले जलमय झाले आहेत. दिवसभरच्या पाऊसाने या परिसरातील गावचे ओहळ आणि बंधारे दुथडी भरून वाहत आहेत.मात्र काही ठिकाणी असलेल्या जुन्या फरशी पूलावरून पाणी जात असल्यामूळे हे पाणी रस्त्यापर्यंत पाण्याने धोक्याची पातळी पार केली आहे.

परंतु गेले काही दिवसांपासून संततधार पडत असल्यामूळे सकाळी कामावर वेळेत पोहोचण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.