Press "Enter" to skip to content

खालापूर प्रेस क्लबच्या वतीने दोन प्रगतशील शेतकरी आदर्श पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

दर वर्षी पावसाळ्यात शेतक-यांच्या शेताच्या बांधावर जावून सत्कार समारंभ केला जात असतो.या वर्षी ही खालापूर प्रेस क्लब च्या वतीने खालापूर तालुक्यातील चौक, आसरेवाडी येथिल संतोष निकम,महड – येथिल पंढरीनाथ पाटील यानां आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शेतकरी शेतामध्ये जीवापाड मेहनत करून धान्य पिकवित असतो.उन्हाची आणि पावसाची तमा न बाळगता तो सतत धडपडत असतो.म्हणूनच त्याला जगाचा पोशिंदा म्हणून ओळखले जाते. अशा शेतक-यांचा खालापूर प्रेस क्लब च्या वतीने वृक्षांचे रोपटे ,शाल, श्रीफळ,सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.

चौक आसरेवाडी येथिल संतोष निकम यांनी शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवित आहे.हिवाळी मध्ये कडधान्ये,पावसाळी भात शेती,माळरान वरती विविध प्रकारची फळ झाडे लागवड करण्यात आली. त्याच बरोबर शेतीला जोड धंदा म्हणून कुकुट पालन करीत आहेत. आज मोठ्याप्रमाणावर पाऊस असल्यामुळे गुरुपौर्णिमा च्या निमित्ताने वरोसेवाडी दत्तमंदिर येथे घेण्यात आला.तसेच महड येथिल असलेले शेतकरी पंढरीनाथ पाटील हे शेती व्यवसाला वाहून घेतले आहे. मस्य पालन,शेती व्यवसाय जोड धंदा म्हणून करीत आहे.पावसाळा खूप असल्यामुळे हा कार्यक्रम महड येथिल वरद विनायक मंदिरात घेण्यात आला. यावेळी त्यांचे कुटुंब हा सन्मान स्विकारण्यासाठी उपस्थित होते.

रायगड प्रेस क्लब क्लब हे प्रत्येक वेळी अनेक उपक्रम राबवीत असतात. सामाजिक बांधिलकी जोपासण्यांचे काम करीत आहे.हे खालापूर प्रेस क्लब उद्दिष्टे असल्याने या वर्षी सुद्धा शेतक-यांचा आदर्श शेतकरी पुरस्कार सन्मान कारण आला.

या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक अनिल विभूते, महड मंदिर विश्वस्त किरण काशिकर, खालापूर तालुका कुषी अधिकारी अर्चना सुळ, मंडळ अधिकारी जगदीश देशमुख, कुषी सहाय्यक चित्रा सारंग, खालापूर प्रेस क्लब सल्लागार भाई ओव्हाळ, अध्यक्ष प्रशांत गोपाळे, उपाध्यक्ष एस.टी.पाटील, काशिनाथ जाधव, सचिव रविंद्र मोरे, प्रसिध्दीप्रमुख समाधान दिसले, सहखजिनदार संतोषी म्हात्रे, सहसचिव राज साळुंखे, सदस्य नवज्योत पिंगळे, रायगड बँकेचे एल.टी.बनसोड, गटनेते किशोर पवार, सामाजिक कार्यकर्ते शेखर पिंगळे, भुषण पाटील हरेश मोडवे, संतोष गुरव, संभाजी पाटील, राम पाटील, यशवंत मुळे, सुनिल गायकवाड, तुळशीराम डुकरे, अतुल टट्टू, अशोक बागूल, रविंद्र हजारे, ह.भ.प.संदीप महाराज यादव, शिवाजी महाडिक, चंद्रकांत महाडिक, रामदास महाडिक, उल्हास निकम, भगवान यादव, पांडुरंग महाडिक, वसंत मोरे, शारदा पाटील, वैशाली पाटील आदीप्रमुखासह मोठ्या संख्येने शेतकरी व विविध ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.