पेणच्या बंटी-बबलीचा तुरुंगातील मुक्काम आणखी 4 दिवस वाढला
सिटी बेल ∆ पेण ∆ प्रतिनिधी ∆
जिल्ह्यातील असंख्य तरुण-तरुणींना फसविणाऱ्या पेणच्या बंटी-बबली या जोडीचा पेण पोलीस स्टेशनच्या तुरुंगातील मुक्काम आणखी 4 दिवस वाढला आहे.
पेण येथील जेएसडब्ल्यू कंपनीत नोकरी देण्याचे तसेच याच कंपनीत भंगार ठेका मिळवून देण्याचा खोटा बनाव करुन आत्तापर्यंत जिल्ह्यातील 43 तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी अल्पावधीतच बंटी-बबली म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या प्रवीणा सावंत व अतुल मांडवकर यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी अनेकांना गंडा घातला आहे.या कटात आणखी किती आरोपी आहेत याचा शोध पोलिस घेत असून अटक असलेल्या बंटी- बबलीला अजून घेणे पेण न्यायालयाने 16 जुलै पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.त्यामुळे या जोडगोळीला आणखी 4 दिवस मुक्काम वाढला आहे.
पनवेल लाईन आळी येथील फिर्यादी अजय पाटील यांनी पेण पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी नुसार, डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीत भंगारचा ठेका व विविध विभागात वेगवेगळ्या नोकऱ्या मिळवून देतो असा खोटा बनाव करून एका राजकीय पक्षाची स्वयंघोषित नेत्या प्रविणा सावंत ( रा.गुरुकृपा सेासायटी,पेण) तसेच तिचा पेण येथील साथीदार अतुल मांडवकर या आरोपी गोळजोडीने जिल्ह्यातील 43 तरुणांकडून प्रत्येकी 30 हजार ते 1 लाख 20 हजार रुपये पर्यंत घेऊन 31 लाख 79 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.या प्रकरणी त्यांच्यावर
फसवणुकीच्या गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी अधिक तपास पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांच्या आदेशानुसार व पेण पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.टी.काळे व पोलिस कर्मचारी करीत आहेत.
Be First to Comment