सिटी बेल ∆ रोहा ∆ समीर बामुगडे ∆
दीपक नायट्रेट लि. कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
कंपनी प्लांट मधील बॉयलरसाठी कोळसा काढत असताना डोक्याला लोखंडी जिना डोक्याला लागून हा अपघात घडला.
ही घटना धाटाव औद्योगिक क्षेत्रातील दीपक नायट्रेट कंपनीमध्ये शनिवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास घडली. सिताराम उमाजी गायकर (वय ४० वर्षे, रा. हेदवली, पो. ऐनघर ता. रोहा) असे मृत कामगाराचे नाव आहे. सिताराम गायकर हे कंपनीमध्ये सेकंड शिफ्ट मध्ये प्लांट मधील बॉयलरसाठी कोळसा काढण्याचे आणि भरण्याचे काम करीत होते. प्लांट मधील जिन्या खालून कोळशासाठी ड्रम काढत असताना गायकारांच्या डोक्याला लोखंडी जिना लागून ते चक्कर येऊन बेशुद्ध होऊन खाली पडले. कंपनी व्यवस्थापनाने गायकर यांना उपचारार्थ रोहा उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी गायकर यांना मृत घोषित केले.
या निमित्ताने कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामगारांना कंपनीकडून सुरक्षेच्या साधनांचा पुरवठा गरजेचा असून, त्याचा योग्य वापरही अपेक्षित असतो. कामगारांना हेल्मेट, सेफ्टी शूज, गमबूट, गॉगल, हातमोजे, सेफ्टी बेल्ट, सुरक्षा पोशाख, कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्र, वेल्डिंग सेफ्टी ग्लास, गॅस डिटेक्टर, वायुगळती सुरक्षा यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा अशी साधने पुरवली जातात; मात्र काही उद्योगांत ती दिली जात नसल्याचे दिसून येत आहे.
Be First to Comment