सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆
राहत्या घराच्या दरवाजाचे लॅच तोडुन घरात प्रवेश करुन बेडरुममधील कपाटात असलेले १०० तोळे वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने घरफोडी चोरी करणाऱ्या आरोपीला मानपाडा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
टिळकनगर पोलीस ठाणेचे हद्दीत राहणारे अमित अशोक झोपे हे त्यांचे परीवारासह पुणे येथे कार्यक्रमासाठी गेले असता, त्यांचे राहते घराचे दरवाजाचे लॅच कोणीतरी अज्ञात चोरटयाने तोडुन घरात प्रवेश करुन बेडरुममधील कपाटात असलेले १०० तोळे वजनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने घरफोडी चोरी करुन नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची घरफोडी ही मोठया स्वरुपातील असल्याने सर्वसामान्य नागरीकांमध्ये असुरक्षीततेची भावना निर्माण झाली होती. मानपाडा पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर घरफोडी चोरी उघडकीस आणणेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न चालु केले होते.
मानपाडा पोलीस स्टेशन कडुन करण्यात आलेल्या प्रयत्नात तांत्रीक माहिती व सी. सी. टी. व्ही फुटेज च्या आधारे आरोपी नामे अभिजीत अलोक रॉय (वय ३६ वर्षे, रा. गल्ली नं. १३, कामाठीपुरा, भायखळा, मुंबई) यास कमाठीपुरा येथून ताब्यात घेण्यात आले असुन त्याचे कडुन एकुण ७१२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व २५७.८९ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा चोरीस गेलेला जसाचातसा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्याचेकडुन इतर ठिकाणी केलेल्या घरफोडी चोरीचा माल देखील हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीवर यापुर्वी मुंबई, मीरा भाइंदर व वसई विरार येथे एकुण १३ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपीत याचा सोन्याचे दागीने गाळण्याचा व्यवसाय असुन त्यात त्याला नुकसान झाल्याने तो घरफोडी चोरीचे गुन्हे करून नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करीत होता. तसेच आरोपी इम्रान अबलेश खान (वय २५ वर्षे रा. ललित काटयाजवळ, मानगांव, डोंबिवली पूर्व) आणि रियाज रमजान खान (वय ३६ वर्षे, रा. नई बस्ती, मेमन मश्जिद जवळ, डोंगरी पाडा, भिवंडी) यांना देखील घरफोडीच्या गुन्हयात अटक करण्यात आले असुन, त्यांच्याकडून एक मोटार सायकल, दोन मोबाईल, कॉपर, पॉलीकॅब वायर, पितळी वॉल व गाडीचे सायलन्सर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नमुद तीन्ही आरोपीत यांचे कडुन मानपाडा व टिळकनगर पोलीस स्टेशन मधील एकुण १० गुन्हे उघडकीस करण्यात आले असुन त्यांचेकडुन एकुण ४० लाख रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, कल्याण परीमंडळ ३ चे पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, कल्याण व डोंबिवली विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांचे मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाणेचे वपोनि शेखर बागडे, सपोनि अविनाश वनवे, सपोनि सुनिल तारमळे, पोना प्रशांत वानखेडे, पोना अशोक कोकोडे, पोना सुशांत तांबे, पोशि संतोष वायकर, पोशि/ तारांचद सोनवने, पोहवा राजेंद्र खिलारे, पोहवा विजय कोळी, पोना प्रविण किनरे, पोना दिपक गडगे, पोना भारत कांदळकर, पोना महादेव पवार, पोना यल्लप्पा पाटील, पोशि महेंद्र मंझा, पोना शांताराम कसबे यांचे पथकाने हि कामगिरी केलेली आहे.







Be First to Comment