Press "Enter" to skip to content

पाच आरोपी गजाआड

पोयनाड आर डी सी बँक येथील एटीएम मधून पैसे चोरीच्या गुन्ह्याची उकल

सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆

अलिबाग तालुक्यातील पोयनाड पोलीस ठाणे हद्दीतील पेझारी येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम मधून पैसे चोरणाऱ्या पाच जणांना पोयनाड पोलिसांनी अटक केली आहे.

पोयनाड पोलीस ठाणे येथे 29 जून 2022 रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास पेझारी शाखेचे व्यवस्थापक राजेंद्र बाळाराम पाटील यांच्या सतर्कतेमुळे सोनू कुमार सरजू प्रसाद गौतम(वय २४वर्षे, रा.उमरव पो.जेठवाडा ता. लालगंज जि.प्रतापगड राज्य-उत्तरप्रदेश सध्या रा.फादरवाडी वसई फाटा जि.पालघर ) या आरोपीला पकडण्यात आले होते.

पेझारी येथील एटीएम मधील पैसे चोरणारा आरोपी सोनू कुमार सरजू प्रसाद गौतम यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याचा वसई येथील साथीदार रणजित कुमार गोविंद प्रसाद(वय १९वर्षे,राहणार-बराडी, सिंकदरापूर,पोस्ट महारादा, ता-साराव, जिल्हा-प्रयागराज,उत्तरप्रदेश, सध्या राहणार रा.फादरवाडी वसई फाटा जि.पालघर )याचे नाव सांगितले.

याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकारी यांना दिली.त्यानुसार पोलीस अधीक्षक अशोक झेंडे यांच्या सूचनेनुसार व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पेणचे प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी शुक्ला यांच्या सूचनेनुसार पोयनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्या पथकाने सोनुकुमार गौतम याचा मित्र रणजित कुमार गोविंद प्रसाद याचा तपास करून पालघर येथून त्यास ताब्यात घेतले.त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता वडखळ तसेच पेण येथील तीन साथीदार (आरोपीची) नावे समजली.रणजित कुमार प्रसाद यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जमील छेदी शेख (वय १८ वर्षे, राहणार-मौआईमा,नई बस्ती,जिल्हा इलहाबाद,उत्तर प्रदेश,सध्या राहणार-वडगाव,पेण),जितेंद्र विनोद सिंग( वय २३वर्षे,राहणार-गायघाट रोड,दहिलामहू, प्रतापगड उत्तरप्रदेश, सध्या राहणार-चिंचपाडा, पेण),व विशाल राजेंद्र यादव (वय२८वर्षे, राहणार-वडखळ तालुका पेण) यांना ताब्यात घेतले.

पकडलेल्या आरोपीकडून अधिक माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की,आरोपी सोनू कुमार सरजू प्रसाद गौतम हा एटीएम मध्ये पैसे चोरी करण्याकरिता प्रवेश केला असता इतर आरोपी हे बाहेर टेहळणी करीत थांबत असत.एटीएममध्ये प्रवेश करणारा आरोपी त्याच्याकडे असलेल्या स्क्रूड्राईव्हरने सदर एटीएम मशीनचे बाहेर येण्याचे शटर उचकटून उपकुन त्याच्याकडे असलेल्या लोखंडी पत्र्याची मशीन सदर शटरमध्ये घुसवून बाहेर आलेली रक्कम त्यांच्याकडील शटर मध्ये घुसवलेल्या मशीनच्या साह्याने बाहेर खेचून सदर पैशाची चोरी करीत असल्याचे उघडकीस आले.

असे प्रकार हे सर्व आरोपी आळी पाळीने चोऱ्या करत असत.त्याचप्रमाणे वयस्कर गोरगरीब ज्यांना एटीम वापरण्याचे माहीत नाही अशा लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत एटीएम मधून त्यांना पैसे काढून देतो असे त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडील एटीएम कार्ड घेऊन पासवर्डची माहिती घेत हातचलाखी करीत एटीएम कार्ड बदलून त्यांच्या एटीएम मधून पैशाची चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीस यांच्याकडून स्क्रूड्राईव्हर,पैसे काढण्यासाठी बनवलेली लोखंडी पत्र्याची मशीन,विविध बँकेचे 32 एटीएम कार्ड,डेबिट कार्ड मिळून आले आहे.

सदरची कामगिरी ही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे,यांच्या नेतृत्वाखाली पोयनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे,पोलीस उप निरीक्षकएम.टी. जाधव,सहाय्यक फौजदार दृष्यत जाधव,सहाय्यक फौजदार रामचंद्र ठाकूर,पोलीस नाईक अक्षय पाटील,पोलीस शिपाई किशोर चव्हाण यांच्या उल्लेखनीय कामगिरी मुळे गुन्हा उघडकीस आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.