Press "Enter" to skip to content

म.न.वि.से. अध्यक्ष अमित ठाकरे श्रीवर्धन दौऱ्यावर

सिटी बेल ∆ श्रीवर्धन ∆ केतन माळवदे ∆

मनसे नेते , विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे ५ ते ११ जुलै पासून कोकण दौऱ्यावर येत असून श्रीवर्धन तालुक्याला भेट देणार असून त्यांच्या दौऱ्याच्या नियोजना संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्रीवर्धन तालुका संपर्क अध्यक्ष प्रतीक राऊत यांनी माहिती दिली.

९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास श्रीवर्धन मध्ये दाखल होतील , वडवली येथील शाखा उद्घाटन तसेच दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरला भेट देतील त्यानंतर भंडारी समाज सभागृहात विध्यार्थीना मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांजवळ संवाद साधतील. तालुक्यातील महाराष्ट्रसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अमित ठाकरे यांच्या स्वागताची तयारी सुरू केली असून , उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.