Press "Enter" to skip to content

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते वृक्ष लागवड

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून तसेच आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षापासून खालापूर तालुक्यातील बहुतांश ठिकाणी वृक्ष लागवड मोहीम घेत वृक्ष संवर्धन काम सुरू असताना ५ जुलै रोजी प्रतिष्ठानच्या वतीने खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हाळ येथे वृक्षांची लागवड केल्याने श्री सदस्यांच्या या उपक्रमाचे तहसीलदार आयुब तांबोळी यांनी कौतुक केले, तर या वृक्षांची स्वच्छता आणि संवर्धन करणार असल्याचे श्री.सदस्यांनी यावेळी सांगितले.

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून काम करताना प्रत्येक सदस्य स्वताजवळ असलेली पदवी विसरून सामाजिक कार्यासा हातभार लावत असल्याचे पाहायला मिळत असून यामुळे अनेक ठिकाणी वनराई फुलल्याचे चित्र पहायला मिळत आहे. वृक्ष लागवड केल्याने पर्यावरणाचा समतोल जो ढासलेला आहे, तो अबाधित राहण्यास मदत होणार आहे. आता अनियमित पडणारा पाऊस याला एकमेव कारण म्हणजे वृक्षांची कत्तल यामुळे आगामी काळातील धोके ओळखता वृक्ष लागवड आणि त्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे.

प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री.सदस्यांनी पिंपळ, निलगिरी, कडूनिंब, तान्हन, करंज, अर्जुन, रीठा, सफकर्णी, कुंतजिवा, निंबारा, रेनट्री, वड, गुलमोहर, ऑस्ट्रोलियन, सुबाबुल, बेहडा या सारख्या वृक्षाची लागवड हाळ करण्यात आल्याने श्री.सदस्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.यावेळी खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, वन अधिकारी – कर्मचारी,पोलीस व मोठ्या संख्येने श्री.सदस्य उपस्थित होते.

वृक्षांची लागवड वनविभागाच्या जागेत करण्यात आली असून उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ॠतू मध्ये श्री.सदस्यांकडून स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवली जात असल्याने पावसाळ्यामध्ये वाढलेले गवत, झुडपे श्री.सदस्य या साफ करून या ठिकाणी वृक्षांसाठी नविन संजीवनी देत असल्याने त्याचे कौतुक करावे तितके कमीच असून सर्वांनी आपआपल्या परिसरात वृक्षांची लागवड करून संवर्धन करावे, जेणेकरून भविष्यात सर्वाना आँक्सिजन चांगल्याप्रकारे मिळेल.
‌ ‌आयुब तांबोळी – तहसीलदार खालापूर

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.