Press "Enter" to skip to content

यशवंत करजेकर सेवानिवृत्त

यशवंत करजेकर यांनी आपले समाजकारण निवृत्तीनंतरही सुरुच ठेवावे : नरेंद्रशेठ जैन

सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆

वरवठणे गावातील असूनही आमच्या मित्रपरिवारातील एक सदस्य असलेले यशवंत करजेकर यांना असलेल्या सामाजिक कार्याच्या आवडीमुळे नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या जीर्णोद्धार समितीच्या अध्यक्षपदी असतांना मी त्यांना जीर्णोद्धार समितीत घेतले होते. राजिपच्या आरोग्य खात्यातील ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते आरोग्य सहाय्यक म्हणून आज सेवानिवृत्त होत असल्याने त्यांनी राजकारणात यावे असे मी मुळीच म्हणणार नसून त्यांनी आपले समाजकारण मात्र अखंडितपणे सुरूच ठेवावे असे मत राष्ट्वादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते व राजिपचे माजी सदस्य नरेंद्रशेठ जैन यांनी व्यक्त केले.

नागोठण्याजवळील वरवठणे गावचे सुपुत्र व नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक यशवंत मधुकर करजेकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने वरवठणे येथील त्यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या कार्यक्रमात नरेंद्रशेठ जैन बोलत होते.

नरेंद्रशेठ जैन पुढे म्हणाले की, नागोठण्याचा ९ वर्षे सरपंच व नंतर राजिपच्या सदस्यपदी असतांना नागोठणे प्रा.आ. केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीचा अध्यक्ष म्हणून मी करजेकर यांची काम करण्याची पध्दत जवळून पाहिली आहे. कोविड काळातील लसीकरण मोहिमेतही त्यांनी जनतेला सर्वोत्तम सेवा दिली. नागोठणे प्रा.आ.केंद्रात राबविलेल्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमामुळे केंद्राला अनेक पुरस्कार मिळण्यात त्यांचा मोठा वाटा होता. प्रा. आ. केंद्राच्या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी सर्वोत्कृष्ट काम करण्याचा नेहमीच प्रयत्न केला. आरोग्य सेवेतच असलेल्या त्यांच्या पत्नीने मुलांच्या शिक्षणासाठी १८ वर्षांच्या सेवेनंतर मध्येच नोकरी सोडल्यानेच आज त्यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित होऊन चांगल्या नोकरीत कार्यरत आहे. असे आमचे मित्र यशवंत उर्फ भाई करजेकर यांना सेवानिवृत्ती नंतर समाजकार्य करण्यासाठी निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छाही नरेंद्रशेठ जैन यांनी त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने दिल्या. दरम्यान नरेंद्रशेठ जैन मित्र परिवारातर्फे यावेळी यशवंत करजेकर व सौ. कीर्ती यशवंत करजेकर यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय नेते भाई टके, हरेषशेठ काळे, बिपीन सोष्टे, डाॅ. राजेंद्र धात्रक, बाळासाहेब टके, गणपतशेठ म्हात्रे, सुभाष पाटील, दिलिप शहासने, उल्हास शिंदे, भाऊ मोरे, चंद्रकांत कामथे, अजय साळुंखे, ज्ञानेश्वर दळवी, मारुती तटकरे, सिराजभाई पानसरे, पत्रकार शामकांत नेरपगार, अॅड. महेश पवार आदींसह करजेकर यांचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.