सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
पंचशील नगर हे मोहोपाडा अचानक मैदानासमोरील वस्तीचे ठिकाण आहे.या वस्तीतील अंतर्गत रस्ते हे खराब झाल्याने येथील नागरिकांना ये जा करताना अडचण येत होती.हि समस्या वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच ताईं पुंडलिक पवार यांनी लक्षात घेतली.त्यांनी पंधरा वित्त आयोगाच्या निधीतून पंचशील नगर गळ्ळीबोलातील अंतर्गत रस्त्यांना पेव्हर ब्लॉक लावण्याचे काम सुरू करुन पंचशील नगर वासीयांना दिलासा दिला आहे.तसेच पंचशील नगर येथील काही सांडपाणी गटारांचीही डागडुजी केली आहे.
सरपंच ताई पुंडलिक पवार यांच्या प्रयत्नातून आम्हा पंचशील नगर वासीयांच्या समस्या सुटत असल्याचे ग्रामस्थ नगिना मॅडम यांनी बोलताना सांगितले.







Be First to Comment