Press "Enter" to skip to content

तरणखोप येथील शासकीय जमीन हडपण्याचा डाव

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆

पेण तालुक्यातील मौजे तरणखोप हद्दीत असणा-या सर्वे नंबर ४/२ ही ४५ गुंठे जमीन शासकीय असून काही धनदांडगे ही जमीन हडप करण्याचा डाव आखत असल्याचे विलास नारायण पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

सदर जमीन मागील अनेक वर्षे आमचे वडीलोपार्जीत कुटुंब कसत आहेत त्यामुळे या सातबारावर कसवणूकदार म्हणून आमची नावे लागावी याकरिता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला असुन ती पुर्तता होत असताना काही धनदांडगे ही सरकारी जमीन आपल्याकडे मिळविण्यासाठी धडपडत करीत आहेत.

नुकतेच शासनाच्या अधिकारी वर्गाने या जागेची मोजणी करण्यास सुरुवात केली असता आम्ही त्या ठिकाणी हरकती घेतल्या मात्र अधिका-यांनी सांगितले की आम्ही शासनाची जागा मोजतो पण मोजणी करते वेळी आजुबाजूच्या शेतकऱ्यांना नोटीस देणे गरजेचे आहे.परंतु असे न करता काही मंडळी ही जमीन हडप करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आम्ही कसत असणारी जमीन कोणाच्या घश्यात जाऊ देणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा आम्ही सर्व कुटुंब याविरोधात उपोषणास बसणार असल्याचे शेतकरी विलास नारायण पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.