नागोठणे गावातील पोलावर चे पथदिवे काही दिवसापासून बंद अवस्थेत
सिटी बेल ∆ नागोठणे ∆ याकूब सय्यद ∆
नागोठणे गावात रस्त्यावर असलेल्या पोलावरचे पथदिवे बंद अवस्थेत दिसत असून पोलावरचा विद्युत पुरवठा काही दिवसांपासून खंडित झाला असून स्थानिक लोकांना रात्रीच्यावेळी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या पावसाळा सुरू झाला आहे गावातील प्रत्येक आळी व मोहल्ल्या मध्ये ग्रामपंचायतीने रस्त्यावर बसवलेल्या पथदिव्यांचा विद्युत पुरवठा काही दिवसापासून बंद अवस्थेत आहे. रात्रीच्या वेळी वयोवृद्ध पुरुष महिला व तरुण मंडळींना अचानक कामा निमित्ताने घराबाहेर पडत असताना गावांमध्ये अंधार पसरला असल्यामुळे गावाची दिशा नक्की कोणती आहे हेच कळत नाही. रात्रीच्या वेळी माणसांना मोकाट कुत्र्यांचा ही त्रास सहन करावा लागत असून या गंभीर प्रकाराकडे नागोठणे ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याची खंत वयोवृद्ध पुरुष महिला तसेच तरुण वर्गा करून व्यक्त होत आहे.
नागोठणे गावात पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे पाहता चोरांचा देखील सुळसुळाट होण्याची दाट शक्यता आहे तसेच चोरीच्या प्रकरणात वाढ होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. असे देखील गावकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे. रात्री अपरात्रीच्या वेळी एखाद्या रुग्णाला त्याचा उपचार करिता दवाखान्यामध्ये घेवून जाण्यासाठी निघाले असता पोला वरचे पथदिवे बंद झाल्याने त्या लोकांना अंधाराचा खूप त्रास सहन करावा लागत आहे.
नागोठणे पोलीस ठाणे कडून जागोजागी सीसीटी कॅमेरा गावातील काही महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आले आहे. कारण गाव सुरक्षित असावे. परंतु गावातील रस्त्यावर असलेले विद्युत पुरवठा पोलावरचे पथदिवे खंडित झाले असल्याने या सीसीटी कॅमेरे सारखे महत्त्वपूर्ण सर्व उपकरणांचा देखील काही दिवसापासून लोकांना उपयोग होताना दिसत नाही तरी नागोठणे ग्रामपंचायतीने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष केंद्रित करावे. अशी नागोठणेतील जनतेतून जोरदार मागणी होत आहे.







Be First to Comment