Press "Enter" to skip to content

निरलॉन कॉलनी रस्त्याची दैन्यावस्था, पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष !

सिटी बेल ∆ रोहा ∆ समीर बामुगडे ∆

निरलॉन कॉलनी पासून ते पंचायत समिती पर्यत तसेच कालवा रोड या दोन्ही रस्त्याची चाळण होत असते रोहा शहरापासून १० मिनिटांच्या अंतरावरील मार्गावर ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नेहमीची रहदारी असणाऱ्या या मार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवाशांना प्रवास करणे कायम डोकेदुखी ठरत असून संथ गतीने प्रवासामुळे वाहतूककोंडी निर्माण होते मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या समस्येकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आणि पंचायत समिती बांधकाम विभागात येणाऱ्या निरलॉन ते पंचायत समिती पर्यंतचा रस्ता रोहा शहराकडे जावे लागते तसेच कालवा रोड आणि निरलॉन कॉलनीकडचा रस्ता लगतच्या दोन्ही बाजूकडेच्या पाटबंधारे विभागाच्या भूखंडावर अतिक्रमण करून झोपड्या उभा केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्या रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला प्रचंड त्रास सहन करून प्रवास करावा लागत आहे. तसेच अनेक बांधकाम व्यासायिकांनी जंलसपादा विभागाची साकव पुलाची पूर्वपरवानगी घेतली नसून शासकीय भूंखडावर अनेक व्यासायिकानी अतिक्रमण करून जागा हडप केल्या असून भविष्यात या बांधकामावर हातोडा पडणार असल्याचे जंलसपादाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सागण्याच्या अटीवर सांगितले.

नागरिकांनी वरसे ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामे पासुन स्वाताच्या मालकी फ्लॅट खेरीदी करताना कुठे फसवणुक होते का हे सर्वप्रथम पाहणे गरजेचे आहे. कारण सध्या वरसे ग्रामपंचायत हद्दीत ९० टक्के बांधकामे अनधिकृत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.