Press "Enter" to skip to content

भाजपा कोषाध्यक्ष सनी यादव यांची मागणी

पालीफाटा ते पाली मार्गावरील डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

पालीफाटा (खोपोली) मार्गे पाली रस्त्याचे नुतनीकरणाचे काम एम.एस.आर.डी.सी च्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून सुरू असताना काही किलोमीटरचे काम पूर्णत्वास गेले असून काही ठिकाणचे काम काही कारणास्तव रखडले असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु नुतनीकरणाचे काम रखडलेल्या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करित रस्ता दुरुस्ती करण्यात आला असता हे दुरुस्ती डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने डांबर उखडून पुन्हा खड्डे पडल्याने हे खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत असल्याने हे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव यांनी केली असून खड्डयाची दुरुस्ती करावी, जेणेकरून सर्वाचा प्रवास सुखकर होईल.

मात्र पावसाळ्यात या मार्गावरील प्रवास सर्वाचा सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन नुतनीकरणाचे काम रखडलेल्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती करीत डांबरीकरण करण्यात आले आहे, परंतु हे डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचे पहिल्याच पावसात समोर आले असून या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काही ठिकाणी मार्गावर खड्डे पुन्हा पडल्याने हे खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत, त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराबाबत नाराजी व्यक्त होत असताना या निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव यांनी केली असून तशी तक्रार यादव यांनी एमएसआरडीसी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनकडे दिली आहे.

पालीफाटा (खोपोली) मार्गे पाली रस्त्याचे अनेक ठिकाणी डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे, परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे केलेल प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे. पुढे पाऊस वाढला तर केलेल हे डांबरीकरण नक्कीच पुर्ण खराब होईल. तरी संबंधित विभागाने सदर ठेकेदारावर कारवाई करावी आणि त्याच पेमेंट थांबवावे. तसेच ठेकेदारावर कारवाई न केल्यास भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. ‌ ‌ – सनी दशरथ यादव (कोषाध्यक्ष – भाजपा रायगड जिल्हा)

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.