Press "Enter" to skip to content

३ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

अवैध वृक्षतोड करून तयार केलेला कोळसा रोहा वनविभागाने केला जप्त, एकावर गुन्हा दाखल

सिटी बेल ∆ रोहा ∆ समीर बामुगडे ∆

अवैध वृक्षतोड करून तयार केलेला १३ पोती कोळसा रोहा वनविभागाने बोलेरो पिकअप गाडीसह जप्त केला असून याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपवनसंरक्षक रोहा अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल रोहा मनोज वाघमारे व स्टाफ प्रमोद पवार वनपाल मेढा, निलेश वाघमारे वनपाल गोफण, तेजस नरे वनरक्षक शेणवई, ज्योती मिरगणे वनरक्षक निडी, योगेश देशमुख वनरक्षक मेढा, जयवंत वाघमारे वनरक्षक यशवंतखार, वनरक्षक फिरते पथक रोहा अजिंक्य कदम, पोपट करांडे, वनरक्षक रोहा विकास राजपूत, वनरक्षक ताम्हणशेत वैभव बत्तीसे, लेखापाल प्रदीप इनामदार या पथकाने रात्री 09.00 वाजता मिळालेल्या गुप्त बातमी वरून रोहा तालुक्यातील अष्टमी एच पी पेट्रोल पंपासमोर बोलेरो पीकअप क्रमांक MH06-AG/5975 ची तपासणी केली असता अवैध वृक्षतोड करून तयार केलेले कोळसा पोती 13 वजन 260 किलो,किंमत 4420/- रुपये व जप्त वाहन क्रमांक MH/06/AG/5975 अंदाजे किंमत 3,00,000/- रुपये विनापरवाना वाहतूक करीत असताना आढळून आला.

सदर वाहनावर भारतीय वनअधिनियम 1927 अंतर्गत वन गुन्हा दाखल करून वाहन व कोळसा पोती असा एकूण एकंदर 3,04,420/- रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हे प्रकरणी वाहन चालक अन्सार शेख रा. नागोठणे, ता. रोहा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.