सिटी बेल ∆ कोलाड ∆ विश्वास निकम ∆
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा -रोहा जिल्हा रायगड पदाधिकारी यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती रोहा यांची सदिच्छा भेट घेऊन खालील विषयावर चर्चा केली.
सदर भेटीत गटशिक्षणाधिकारी श्रीम.धायगुडे यांनी तालुक्यातील सर्व शिक्षकांनी वेळेवर शाळेवर जाऊन अध्यापनाचे काम चांगले करावे तसेच शिक्षकांचे तालुक्या स्तरावरचे प्रश्न आपण लगेच मार्गी काढून शिक्षकांची अडचण होणार नाही अशा पद्धतीचे आश्वासन दिले, अशा सर्व विषयावर माननीय गटशिक्षणाधिकारी मॅडम यांनी संघटनेशी सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी शिक्षक परिषदेचे (कोकण विभाग कार्यवाहक) उमेश महाडेश्वर ,तसेच संघटनेचे तज्ञ मार्गदर्शक मा.श्री आशिष पवार तालुका (कार्यवाहक ), मा.श्री उमाजी जाधव (तालुकाअध्यक्ष ),सुभाष जाधव (तालुका उपाध्यक्ष ), अमोल राठोड (तालुका उपाध्यक्ष ), वासनिक (तालुका कोषाध्यक्ष), विठ्ठल पाटील,मदन गिरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.







Be First to Comment