ग्रूप ग्राम पंचायत माजगांव परिसरात सिसीटिव्ही कॅमेरांचे खालापूर पोलीस निरिक्षक अनिल विभुते यांच्या हस्ते अनावरण
सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆
खालापूर तालुक्यातील ग्रूप ग्राम पंचायत माजगांव नागरिकांच्या सुरक्षतेची काळजी घ्यावी या उद्दात विचारांतून तसेच वाढती लोकसंख्यामुळे चोरी तसेच अन्य प्रकार घडत असल्यामुळे ग्रामस्थांना कोणत्याही संकटाला सामोरे जावू नये यासाठी खालापूर पोलीस निरिक्षक अनिल विभुते यांच्या हस्ते आज या सिसीटिव्ही कॅमेरांचे अनावरण करण्यात आले.
यावेळी एपीआय गणेश कराड, पोलीस समिर पवार उपस्थित होते ,तसेच ग्राम पंचायत माजगांव येथे सर्व या कॅमेरांचे नियंत्रण असल्यांने कोणताही औचित्य प्रकार घडल्यास तिसरा डोळा आरोपी यांना शोधण्यांची महत्वपूर्ण भूमिका बजावत असणार आहे.

यावेळी आपले विचार व्यक्त करतांना विभुते म्हणाले की चोरीच्या गुन्हावर तिसरा डोळा अंकुश ठेवत आहे. तालुक्यातील १५ पेक्षा जास्त गुन्हे सीसीटिव्ही मुळे उघड झाले.त्याच बरोबर नांवढे गावातील चोरीचा मोठा प्रकार या सीसीटिव्ही मुळे उघड झाला.त्याच बरोबर या तिसरा डोळ्यामुळे गुन्हेगाराला शोधण्यासाठी सहज सोपे होते.यामुळे प्रत्येक ठिकाणी तिसरा डोळा बसविणे गरजेचे आहे.कोरोनांच्या काळात सरपंच गोपीनाथ जाधव यांच्या घरासमोर असलेल्या सीसीटिव्ही मुळे एका मोठा गुन्हा उकल झाला असे अनेक महत्व पुर्ण कामे तिसरा डोळा करीत असल्यांचे त्यांनी सांगितले.
ग्राम पंचायत परिसरात सिसिटिव्ही असावे अशी संकल्पना ग्रामपंचायत ने घेतल्यांने थोड्या दिवसात संपूर्ण ग्राम पंचायत गावे रस्त्याच्या ठिकाणी,रहदारी मार्ग आश्या विविध ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले.ग्लोबल सोलूशन विजय दुर्गे ,अक्षय जाधव यांच्या माध्यमातून हे कॅमेरे बसविण्यात आले.
यावेळी,सरपंच गोपीनाथ जाधव,उप सरपंच नितिन महाब्दि,सदस्य – रमेश ढवालकर,अर्चना शिंदे,पोलीस पाटील माजगांव – रेश्मा ढवालकर ,वारद – मनिषा शिंदे,जन धन योजना – क्रांती पाटील,अविनाश कांबळे,विनायक गायकवाड,देवराम कांबळे,जयेश पाटील के.एल जाधव,एस.के.कांबळे, विलास कांबळे,,जनार्धन जाधव,ग्राम पंचायत कर्मचारी – संतोष काठावले , भिवा देशमुख राजिप शाळा शिक्षक वर्ग अदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन जयवंत पाटील यांनी केले.







Be First to Comment