Press "Enter" to skip to content

भारत मुक्ती मोर्चाकडून शनिवारी भारत बंदचे आवाहन

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

देशात गेल्या काही दिवसापासून ज्ञानव्यापी मज्जिद, भोंगे, आणि नुपुर शर्मा च्या माध्यमातून हजरत महंमद पैंगबर साहेब यांची अवमानना करणारे वक्तव्य या घटना घडवून आरएसएस देशात हिंदू मुस्लिम दंगली घडवून देशाची एकता व अखंडता तोडण्याचा प्रयत्न करत आहे, अशा देशविघातक शक्ति विरोधात राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा या संघटनांचे राष्ट्रीय संयोजक / अध्यक्ष मा. वामन मेश्राम यांनी दि. 25 जुन 2022 रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे.

या बंदला पनवेलसह रायगड जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी आणि जनतेला या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. या बंदच्या आवाहनाला समाजातून चांगले सहकार्य मिळत आहे, अनेक पक्ष सघटनांनी बंदला समर्थन दिले आहे.अशी माहिती बहुजन क्रांती मोर्चाचे सहसंयोजक मनोज महाले यांनी दिली आहे. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे प्रविण पाटील, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे मनोज रामधरणे, छत्रपती क्रांती सेनेचे श्रीयश म्हस्कर, राष्ट्रीय किसान मोर्चा चे मधुकर म्हात्रे, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे मोलाना मोहसीन आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.