Press "Enter" to skip to content

भाजपाचे मिशन लोकसभा २०२४

भाजप नेते प्रकाश जावडेकर रायगड जिल्हा दौर्‍यावर

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

मिशन लोकसभा २०२४ साठी भाजपा सज्ज असल्याने प्रत्येक बूथ लेव्हल कार्यकर्त्यांनी जनसामान्यात जाऊन मोदी सरकारने राबवलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळापर्यंत द्यावी असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी खोपोली येथे केले.मावळ लोकसभा मतदार संघातील रायगड जिल्ह्यातील उरण पनवेल कर्जत खालापूर या तालुक्यातील बुथ लेवल कार्यकर्त्यांची भाजप नेते प्रकाश जावडेकर संवाद सादर असून पक्ष संघटना अधिक मजबूत व कार्यक्षम कशी होईल यासाठी दौऱ्यावर आहेत.

जावडेकर यांनी रविवारी खोपोली येथे काही भागातील कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या त्यानंतर त्यांनी अश्विनी ताई पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या शहर पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करून मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांची संवाद साधून आगामी निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांनी कशाप्रकारे तयारी करावी. याचे बहुमुल्य मार्गदर्शन केले त्यांनी मार्गदर्शन करताना आगामी काळात भाजपला चांगले दिवस आहेत, जनसामान्यात भाजपची प्रतिमा दिवसेंदिवस उज्वल होत आहे त्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मोदी सरकारच्या योजनांची माहिती देऊन जनतेशी सुसंवाद साधावा असेही आवाहन केले.

प्रारंभी रायगड जिल्हा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी ताई पाटील तसेच भाजप शहराध्यक्ष खंडेलवाल यांनी जावडेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.या बैठकीला रायगड जिल्हा संघटक अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे जिल्हा चिटणीस रमेश मुंडे,खोपोली सरचिटणीस हेमंत नांदे प्रमोद पिंगळे, शहर महिला मोर्चा अध्यक्ष शोभा काटे, सरचिटणीस अश्विनी अत्रे, जिल्हा महिला मोर्चा कोषाध्यक्ष रसिका शेटे ,खोपोली शहर चिटणीस गोपाळ बावस्कर, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुळकर ,सरचिटणीस विनायक माडपे , सिद्धेश पाटील,ज्येष्ठ कार्यकर्ते वामनराव दिघे, हिंमतराव मोरे, विजय तेंडुलकर, कामगार आघाडी सेलचे अनिल करणुक, मीडिया सेलचे राहुल गायकवाड, माजी नगरसेविका अनिता शहा, सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या बैठकीत उपस्थित होते.

दरम्यान ॲड राजेंद्र येरुणकर यांनीही जावडेकर यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली, जिल्हा संघटक अविनाश कोळी यांचा वाढदिवस असल्याने जावडेकर यांनी केक कापून कोळी यांना शुभेच्छा दिल्या.ज्येष्ठ साहित्यिक रवा दिघे यांच्या जीवनावर लिहिलेल्या पुस्तकाची प्रत वामनराव दिघे यांनी जावडेकर यांना दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.