Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी ॲड. रंजना धुळे

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या कर्जत तालुका अध्यक्षपदी ॲड.रंजना धुळे यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची सभा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली रोहा सुतारवाडी येथे गीता बाग मध्ये संपन्न झाली. याप्रसंगी राज्याच्या राज्यमंत्री रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदीती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्षा उमा मुंढे, माजी जिल्हाध्यक्षा गीता पालारेचा, माजी जिल्हाध्यक्षा दीपिका चिपळूणकर, युवती अध्यक्षा सायली दळवी व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाध्यक्षा उमा मुंढे यांनी प्रास्ताविक केले.खासदार सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे असे सांगत असताना आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षातील महिला संघटनेची भूमिका ही महत्वपूर्ण असेल असे सांगितले.पालकमंत्री कु.आदीती तटकरे यांनी मार्गदर्शन करताना या सोशल मीडियाच्या युगात महिलांनी जास्तीत जास्त सक्रिय राहून त्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचून पक्षसंघटना मजबूत करावी असे सांगितले. त्याचबरोबर नवनिर्वाचित अध्यक्षा उमा मुंढे यांनी अगदी कमीत कमी कालावधीत 88 महिलांची जंबो कार्यकारिणी जाहीर केली त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

कर्जत तालुक्यात तालुकाध्यक्षा ॲड.रंजना धुळे, कर्जत शहराध्यक्षा पुष्पा दगडे, तसेच जिल्हा सरचिटणीसपदी पूजा सुर्वे यांची फेरनियुक्ती करण्यात आली असून अस्मिता मोरे, शुभांगी कळंबे, सीमा गरुड यांची जिल्हा कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.