बोलेरो गाडीसह १ हजार किलो लाकडी कोळसा जप्त !
सिटी बेल ∆ रोहा ∆ समीर बामुगडे ∆
अवैध वृक्षतोड करून तयार केलेल्या लाकडी कोळशाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच रोहा वनविभागाने तातडीने घटना स्थळावर जाऊन १ हजार किलो लाकडी कोळशासह बोलेरो पिकअप गाडी जप्त करून गुन्हा नोंदविला आहे.
उपवनसंरक्षक रोहा श्री अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा श्री विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन रोहा श्री विकास रा.भामरे व स्टाफ श्री आर.जी.पाटील, वि.टी.ठाकूर वनपाल फिरते पथक रोहा,वनरक्षक फिरते पथक रोहा अजिंक्य कदम,पोपट करांडे यांनी दिनांक 14/06/2022 रोजी रात्री 21.20 वाजता मिळालेल्या गुप्त बातमी वरून महाड तालुक्यातील राजेवाडी शिरगाव रस्त्यावर गस्त करीत असताना बोलेरो पीकअप क्रमांक MH/06/BW/0355 ची तपासणी केली असता अवैध वृक्षतोड करून तयार केलेले लाकडी कोळसा पोती 50 वजन 1000किलो किंमत 17000/- रुपये व बोलेरो पीकअप अंदाजे किंमत 5,00,000/- विनापरवाना वाहतूक करीत असताना आढळून आला.
सदर वाहनावर भारतीय वनअधिनियम 1927 अंतर्गत वन गुन्हा दाखल करून वाहन व कोळसा पोती असा एकूण एकंदर 5,17,000/- रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्हे प्रकरणी वाहन चालक मालक राहुल तुळशीराम कंक रा.तळीये तालुका. महाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Be First to Comment