सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
विद्या प्रसारिणी सभा चौक संचलित
सर नौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक मध्ये “योगा दिन ” मोठ्या उत्साहाने आयोजित करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्रभाई शहा यांनी विविध योगासनांचे प्रकार प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमवेत करून दाखविले व योगाचे महत्त्व विषद केले.योगा केल्याने शरीराला काय फायदे होतात यावर सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.सदर प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक भोमले सर, पर्यवेक्षक मोळीक सर, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शाळेचे शारीरिक शिक्षक कुंभार सर यांनी विविध योगासने करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.







Be First to Comment