Press "Enter" to skip to content

वडखळ सरपंचांची पत्रकार परिषद

शेतकऱ्यांच्या विकासासाठी एमआयडीसी प्रकल्पाला पाठिंबा — सरपंच राजेश मोकल

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆

पेण तालुक्यातील वडखळ ग्रामपंचायत हद्दीत होऊ घातलेल्या एमआयडीसी प्रकल्पाला वडखळ हद्दीतील कोळवे, वावे येथील काही शेतकऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला असल्याने या भागासह शेतकऱ्यांच्या विकासासाठी एमआयडीसी प्रकल्पाला आमचे प्राधान्य असल्याचे वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी उपसरपंच योगिता मोकल, माजी उपसपंच जगदीश म्हात्रे, सदस्य विजय म्हात्रे, प्रमिला म्हात्रे, धनंजय नाईक, संगीता भोईर, जयवंती म्हात्रे, सुरेखा म्हात्रे, अनिता म्हात्रे आदि उपस्थित होते.

पेण तालुक्यातील वडखळ ग्रुप ग्राम पंचायत हद्दीत असणारे वावे आणि कोळवे भागातील सरपंच या नात्याने जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविणे हे माझे कर्तव्य असून त्यामुळे शेतकऱ्यांचा एमआयडीसी प्रकल्पाबाबत जो निर्णय होईल त्या निर्णयाला अनुसरून आम्ही शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी असणार आहोत.वडखळ भागात जेएसडब्ल्यू
कंपनी आल्यानंतर या भागाचा विकास झपाट्याने झाला आहे. येथील स्थानिकांना रोजगानिर्मिती मिळाली असून रोजगाराचा प्रश्न सुटला आहे.मात्र या एमआयडीसी प्रकल्पा बाबत काही राजकीय पुढारी शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत.त्यांनी आदानींच्या प्रकल्पात शेतकऱ्यांना किती वाढीव मोबदला मिळवून दिला आहे. हे तपासून पाहणे गरजेचे आहे.वडखळ हद्दीतील असणा-या शेतकऱ्यांना एमआयडीसी प्रकल्पाकडून जास्तीत जास्त भाव आणि एका सदस्याला नोकरीत सामावून घेण्यासाठी आमच्याकडून सातत्याने प्रयत्न असणार आहे.जो पर्यंत शेतकरी स्वता जमिन देण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत त्याच्यांवर कोणीही बळजबरी करणार नसल्याचे सांगून या भागाच्या विकासाकरीता माझे सर्व सहकारी या प्रकल्पाला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मी कोळवे गावातील शेतकरी असुन आमच्या भागात येऊ घातलेल्या एमआयडीसी प्रकल्पामुळे या भागातील विकासाला चालना मिळणार आहे, सरपंचांनी म्हटल्या प्रमाणे आम्हाला योग्य भाव आणि शेतकऱ्याच्या कुटुंबियाला नोकरीत सामावून घेत असतील तर माझी जमीन देण्यास माझी पूर्णपणे संमती असुन आमच्या भागातील इतर काही शेतकरी देखील एमआयडीसी प्रकल्पासाठी जमिनी देण्यास तयार आहेत.
बाळकृष्ण म्हात्रे — शेतकरी कोळवे

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.