सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
पुण्याहून पावसाळ्यात पर्यटनाला आलेल्या आकाश सुधाकर नाईक याचा मृतदेह सोमवारी सकाळी दुसऱ्या प्रयत्नात अपघातग्रस्तांच्या मदत टीमला सापडला आहे.
खालापूर तालुक्यातील कलोते हे राज्य सरकारचे धरण आहे.या ठिकाणी पर्यटकांची वर्दळ असते.काल नवीमुंबई येथील एका परिवारातील काहीजण कलोते धरणाच्या मधोमध असलेल्या खत्री फार्महाऊस जवळ फिरण्यास आले होते.यात एकाच कुटुंबातील पुरुष व स्त्रिया होत्या.हे सर्वजण पाण्यात डुंबण्यासाठी उतरले असता,पाण्याचा अंदाज न आल्याने यातील आकाश सुधाकर नाईक रा.पुणे वय वर्षे अंदाजे २७ हा बुडाला .
आकाश हा पाण्यात बुडल्याचे समजताच खालापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनील विभुते त्यांचे सहकारी व अपघातग्रस्तांच्या मदतीला ही टीम रुग्णवाहिका सोबत घटनास्थळी पोहोचली.पोलीस व अपघातग्रस्त टीम आकाश चा पाण्यात शोध घेत असता सायंकाळ झाली, तोपर्यंत अंधार पडायला सुरुवात झाली होती. पाऊसही सुरु झाला होता. त्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली होती.
आज सकाळीच सपोनि.कराड, त्यांचे सहकारी गडदे,म्हात्रे,घुगे,कांबळे, तसेच मंडळ अधिकारी किरण पाटील, तलाठी अमोल बोराटे घटनास्थळी हजर झाले. अपघातग्रस्तांच्यायला मदतीला या टीम चे गुरुनाथ साठेलकर,खालापूर नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष राजेश पार्टे,दिनेश ओसवाल,हनीफ कर्जिकर,अमोल कदम हे धरणाच्या पाण्यात शोध घेण्यासाठी उतरले,त्यांच्यासोबत संतोष मोरे,अमित गुजरे हेही होते,साधारण दोन तासाच्या शोध मोहीम नंतर आकाश चा मृतदेह हाती लागला.
खत्री फार्महाऊस हा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मधोमध आहे,या धरणात अनेक बळी गेले आहेत. नुकतीच खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी पावसाळ्यात होणाऱ्या अपघात स्थळी भेट देऊन योग्य त्या सूचना दिल्या होत्या,तर पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी गाव पोलीस पाटील यांची बैठक घेऊन त्यांना सतर्क राहावे असा आदेश दिला आहे.मात्र येणारे पर्यटक हे अती उत्साही असतात,कोणत्याही प्रकारची चौकशी न करता अनोळखी जागेत वावरतात,त्यामुळे असे प्रकार घडतात.
Be First to Comment