सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆
रसायनी – पाताळगंगा परिसरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या मोहोपाडा व नवीन पोसरी येथील मार्केट मधील स्ट्रीट लाईट गेल्या सहा ते सात महिन्यापासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांत नाराजीचा सूर होता.या परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्याने चो-या चिलट्याचे भय होते.
नविन पोसरी बाजारपेठ व गावच्या परिसरात रात्रीस काळाकुट्ट अंधार पडत असल्याने अनेकदा रसायनी पोलिस ठाण्याकडूनही व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांना फोन यायचे.यासाठी नागरिकांनी स्ट्रीट लाईट संदर्भांत तक्रार केल्यानंतर ग्रामपंचायतही प्रयत्नशील होती.परंतू पावसाळा सुरू झाल्याने गुरुवार दि.17 रोजी नविन पोसरी व बाजारपेठेतील दुकानदार, ग्रामस्थांनी एकत्र येऊन सदर समस्येवर आवाज उठवत मोहोपाडा विजमंडळ कार्यालयावर मोर्चा काढला.
यावेळी विजवितरणाचे उप अभियंता किशोर पाटील यांच्यासोबत चर्चा होत असताना मोहोपाडा नविन पोसरी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय होताच स्ट्रीट लाईट नवीन मीटर लावण्याचे ठरले.परंतु चर्चेंअंती नवीन पोसरी गाव बाजारपेठेतील स्ट्रीट लाईट चालू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन व्यापारी असोसिएशन व नवीन पोसरी ग्रामस्थांतर्फे एमएसईबी अधिकारी किशोरकुमार पाटील यांना देण्यात आले.
यावेळी नागरिकांनी एमएसईबी अधिकारी यांना घेराव घालत स्ट्रीट लाईट चालू करा अशी मागणी केली.यानंतर वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच ताई पवार यांनी दखल घेऊन विजमंडलळाशी कागदोपत्री पत्रव्यवहार पुर्ण केला असल्याचे समजते.यानुसार गुरुवारी रात्री स्ट्रीट लाईट पुर्ववत सुरू झाला.
याप्रसंगी वासांबे ग्रामपंचातीच्या सरपंच ताई पवार, मा.प्रभारी सरपंच राकेश खारकर, मा. सरपंच निलम पाटील, मा. उपसरपंच सदगुणा पाटील, ग्रा. सदस्य मिनाक्षी पाटील, सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील, सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाटील, ग्रा. सदस्य रतन पाटील, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष प्रदीप पाटील, सचिव अमित शहा, यांच्यासह व्यापारी वर्ग व नवीन पोसरी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
स्ट्रीट लाईट चालू करण्यासंदर्भात व्यापारी असोसिएशन तर्फे निवेदन देण्यात आले असून स्ट्रीट लाईटसाठी नवीन मिटर लावून स्ट्रीट लाईट चालू करण्यात येणार असून ग्रामपंचायतीने स्ट्रीट लाईटचे थकबाकी बिल भरावे. — किशोर पाटील,उप अभियंता, एमएसईबी मोहोपाडा







Be First to Comment