Press "Enter" to skip to content

पेण पाणीपुरवठा कार्यालयावर आदिवासी बांधवांची धडक

सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆

पेण तालुक्यातील बेणसे हद्दीतील गांधे आदिवासी वाडीच्या नागरीकांना मागील अनेक दिवस पिण्याचे पाणी येत नसल्याने अखेर त्यांनी पेण ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयावर धडक दिली.

यावेळी जिप.माजी सभापती संजय जांभळे, वसंत मोकल, प्रमेद पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना याबाबत जाब विचारून या गावासाठी असणारी पाईप लाईन सुद्धा अर्धवट अवस्थेत आहे.शासनाच्या १५ व्या वित्त आयोगातून गांधे आदिवासी वाडीकरिता पाईपलाईन मंजूर करण्यात आले होते.परंतु या कामाकरिता लाईन आऊट देखील न करता अगदी वरच्या वर खड्डा मारून जीर्ण पाईपलाईन टाकण्यात आली आहे.मात्र या पाईप लाईन वरून या आदिवासी वाडीतील बांधवांना पाणीपुरवठाच होत नाही.त्यामुळे या लोकांनी कित्येक दिवस असेच जीवन जगायचे शासन त्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना राबवित असताना सुद्धा या बांधवांना पाण्यासाठी मुलाबाळांना घेऊन यावे लागते ही शोकांतिका आहे याची चौकशी झाली पाहिजे असे यावेळी संजय जाभाळे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

शिहू ग्रामपंचायतीमधील गांधे आदिवासी वाडीतील आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे.अनेकदा ग्रामपंचायत तसेच पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे तक्रारी केल्या पण कोणीच आमच्या कडे लक्ष देत नाही त्यामुळे लवकरच आम्ही आंदोलन करू असे यावेळी आदिवासी महिलांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.