सिटी बेल ∆ पोलादपूर ∆ शैलेश पालकर ∆
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांवर भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आल्याबद्दल पोलादपूर येथील भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळयाजवळ फटाके वाजवून आनंद साजरा केला.
याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष राजा दिक्षित, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजन धुमाळ, युवा मोर्चा रायगड जिल्हा चिटणीस महेश निकम, युवा मोर्चा पोलादपूर तालुका अध्यक्ष प्रतिक सुर्वे आणि सोशल मिडीया सेलचे क्षितीज धुमाळ आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.








Be First to Comment