Press "Enter" to skip to content

श्रीसमर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या पोलादपूर तालुकाध्यक्षपदी सागर शेलार

सिटी बेल ∆ पोलादपूर ∆ शैलेश पालकर ∆

महाड येथील श्री समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्यावतीने शुक्रवार दि.10 जून 2022 रोजी पोलादपूर येथील श्रीदेवी गंगामाता सभागृहामध्ये श्रीसमर्थ दिव्यांग संस्थेच्या महाड तालुका अध्यक्षा दिप्ती शेडगे, खजिनदार आतीफभाई चाफेकर, सचिव मुबीन देशमुख, अनिल जाधव, महाड शहर अध्यक्ष शहजाद चरफरे उपस्थित होते.

जेष्ठ सलागार सुरेश पाटील यांनी पोलादपूर तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांना व भगिनींना विविध योजनेबदल मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी पोलादपूर तालुक्यातील 25 ते 30 अपंग बांधव उपस्थित होते.

याप्रसंगी श्री समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्था पोलादपूर कमिटी तयार करण्यात आली असता कालवली येथील सागर शेलार यांच्याकडे पोलादपूर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. तालुका उपाध्यक्षपदी अब्दुल्लाह धामणकर, सचिवपदी अरूण कदम, सहसचिवपदी पांडूरंग मोरे आणि खजिनदारपदी दिलीप सावंत यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी सर्व दिव्यांग बांधव व भगिनींनी उपस्थित राहून श्रीसमर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या कामकाजामध्ये सहभागी होऊन सक्रीय होत असल्याबद्दल स्वागत करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.