Press "Enter" to skip to content

नागोठण्यात भाजपाचा विजयोत्सव साजरा

सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆

राज्यसभेच्या रिक्त झालेल्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राज्यातील महा विकास आघाडीला मोठा धक्का विरोधी पक्षनेते
देवेंद्र फडणवीस यांनी आपली नेतृत्वाची चुणूक दाखवल्याने भाजपाचे तीनही उमेदवार निवडून आले. त्यामुळे नागोठण्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून विजयोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मारुतीराव देवरे, उपाध्यक्षा श्रेया कुंटे, रोहा तालुका सरचिटणीस आनंद लाड, ज्येष्ठ नेते परशुराम तेलंगे, नागोठणे शहराध्यक्ष सचिन मोदी, गौतम जैन, प्रियंका पिंपळे, रऊफ कडवेकर, विठोबा माळी, तिरत पोलिसानी, शेखर गोळे, राजेंद्र देवरे, धनराज धुमाळे, उपस्थित होते.

तत्पूर्वी या विजयोत्सवाची सुरुवात भाजपाचे नागोठणे शहराध्यक्ष सचिन मोदी यांच्या कार्यालयातून करण्यात आली. यावेळी नागोठणे येथील एक वयोवृद्ध निराधार महिला श्रीमती वत्सला वाघमारे यांना सचिन मोदी यांच्या मातोश्री श्रीमती वीणा मोदी यांच्या हस्ते सदर विजयाच्या निमित्ताने साडी भेटवस्तू स्वरूपात म्हणून देण्यात आली. तसेच त्यांचा मान सन्मान करण्यात आला.

यावेळी वाघमारे यांनी आपल्या वैद्यकीय अडचणींबाबत शहराध्यक्ष सचिन मोदी यांना सांगितले. यावेळी क्षणाचाही विचार न करता सचिन मोदी यांनी त्यांचा वैद्यकीय खर्च उचलण्याचे मान्य केले व त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे कबूल केले. यानंतर सर्व कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गेले. कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे हातात घेऊन “देवेंद्रजी आगे बढो, हम तुम्हारे साथ है ” या व इतर अनेक घोषणांनी सारा परिसर दुमदुमून सोडला.

यानंतर तेथे जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी हा आनंदोत्सव साजरा केला. या विजयामुळे सर्व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी आमदार रवीशेठ पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.

देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपल्या बुध्दी चातुर्याने भाजपाच्या सर्व उमेदवारांना निवडून आणल्याने त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच असून या निकालामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून विभागात भाजपाची ताकद वाढण्यास नक्कीच मदत होईल तसेच खा. सुनील तटकरेंसोबत काम केल्यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते मारुती देवरे यांना यांना दांडगा अनुभव असल्याने त्यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाल्यास ते नक्कीच निवडून येतील असे मत यावेळी भाजपाचे नागोठणे शहराध्यक्ष सचिन मोदी यांनी व्यक्त केले.

यावेळी मारुतीराव देवरे, श्रेया कुंटे, आनंद लाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व शहराध्यक्ष मोदी यांनी दाखवलेल्या दिलदारपणाचे सरचिटणीस लाड यांनी कौतुक केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.