Press "Enter" to skip to content

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन कर्जत मध्ये साजरा

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन कर्जत मध्ये साजरा करण्यात आला या वर्धापन दिनानिमित्त कर्जत मध्ये ध्वजारोहण करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कर्जत राष्ट्रवादी भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा उमा मुंढे तसेच जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला.

याप्रसंगी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे, उपाध्यक्ष अशोक भोपतराव, गटनेते शरद लाड, तालुकाध्यक्षा रंजना धुळे, शहराध्यक्ष पुष्पा दगडे, सरचिटणीस पूजा सुर्वे, वर्षा पाटील, रेश्मा चौधरी, रजनी गायकवाड, सुवर्णा निलधे, वंदना थोरवे, संतोष पाटील, कैलास पोटे, संतोष थोरवे, बाळू ऐनकर, बाळू गायकवाड, अक्षय जाधव, निलेश घरत, केशव वांजळे, धीरज जाधव, सुदेश हजारे,जयंत पाटील, ऋषभ लाड, नंदू रुठे,महेश चंदन आदी उपस्थित होते.

यावेळी जेष्ठ नेते तानाजी चव्हाण यांनी पक्षाच्या स्थापने पासूनच्या वाटचाली विषयी माहिती सांगून भविष्यात संघटना मजबूत करण्याविषयी मार्गदर्शन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.