Press "Enter" to skip to content

एका मुलीचा जीव वाचवून संपूर्ण कुटुंब त्या संकटापासून सावरले

लवजी स्थानकात पत्रकाराने वाचविले तरुणीचे प्राण

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

पत्रकार बातमी लिहित असतांना सामाजिक बांधिलकी सोबत एखाद्यावर घडत असलेल्या अन्याया ला वाच्या सुद्धा सातत्याने फोडत असतो.तर कधी तो देवदूत म्हणून प्राण वाचविण्या सारखे पुण्य आपल्या ओंजळीत घेत असतो.असचे एका तरुणींचे प्राण वाचविण्यात पत्रकार विनित जाधव यांना यश आले.

कर्जत खोपोली रेल्वे मार्गावरील लवजी स्थानकात ट्रेन मधून उतरत असताना, एका तरुणीचा तोल गेल्याने ती खाली पडली, पण त्या क्षणी ट्रेनमध्ये प्रवासी पत्रकार यांनी प्रसंगावधान राखून सदर तरुणीस प्लॅटफॉर्मवर ओढल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. विनीतच्या धाडसाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खोपोलीहून सुटलेली सायंकाळी सहाच्या सुमारास मुंबई येथे जाणारी ट्रेन लवजी स्थानकात आल्यानंतर एक तरुणी व तिच्या आई ट्रेन मधून उतरत असताना, तरुणीचा तोल जाऊन प्लॅटफॉर्म व ट्रेनच्या मधल्या भागात हात व पाय जात असतानाच त्याच ट्रेनमधुन प्रवास करीत असणाऱ्या पत्रकार विनित जाधव यांनी प्रसंगावधान राखून त्या तरुणीला तात्काळ पलोटफॉर्मावर ओढले ,त्याक्षणी ट्रेनही सुरु झाली होती. त्या तरुणीची आई प्लॅटफॉर्मवर कोसळली होती. दरम्यान दोघीजणी सुखरूप आहेत. नंतर त्या दोघीजणी रिक्षातून निघून गेल्यामुळे त्यांची नावे समजली नाही.यामुळे त्यांनी एका मुलींचा जिव वाचवून संपूर्ण कुटुंब त्या संकटापासून सावरल्यांने तरुण पत्रकार विनित जाधव यांचं धाडसाचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.