सिटी बेल ∆ नागोठणे ∆ याकूब सय्यद ∆
नागोठणे-येथील को. ए.सो. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय, नागोठणे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून शिवस्वराज्य दिन दिनांक 06/06/2022 रोजी सकाळी 10:30 वाजता साजरा करण्यात आला महाराष्ट्र शासनाने ६ जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचे सर्व महाविद्यालयांना कळविले होते.
या कार्यक्रमांतर्गत शिवाजी पेठ नागोठणे येथिल नियोजीत पुतळ्याच्या चौथार्यापासून शिव मशाल रॅली चे आयोजन केले होते या प्रसंगी महाविद्यालय विकास समिती सदस्य मा. अनिल काळे, ॲड. सौ.सोनल जैन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश गुरव, व महाविद्यालयीन प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.
महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कु. अनुजा वाटवे, कु. खांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी महाराज्यांच्या राज्यभिषेक सोहळ्याला उजाळा देतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांनी मार्गदर्शन केले. तसेच ॲड. सौ. सोनल जैन, व पत्रकार मा. राज वैशंपायन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा पर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरूवात महाराष्ट्र गीताने केली व सांगता राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीकृष्ण तुपारे यांनी केले व आभार कार्यक्रम अधिकारी डॉ. विकास शिंदे यांनी मानले. सदर कार्यक्रमास अंतर्गत मुल्यमापन समिती प्रमुख प्रा. दिनेश भगत, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजय चव्हाण, ग्रंथालय प्रा. हेमंत जाधव, प्रा. डॉ. स्मिता चौधरी, श्रीमती ज्योती पाटील, श्रीमती विनया पाटील सह सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.








Be First to Comment