Press "Enter" to skip to content

कही खुशी कही गम ! ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण सोडत

चौक, तुपगाव, आसरे,लोधिवली, टेंबरी व वाबंढळ या ग्रामपंचायत कार्यालयात प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆

ग्रामपंचायत निवडणूक प्रभाग आरक्षण सोडतीत आज कही खुशी कही गम बघण्यास मिळाला,ज्या ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधी ची मुदत संपली त्याठिकाणी आज प्रभाग रचनेची सोडत काढण्यात आली. यावेळी लहान मुलांच्या हस्ते सोडत चिठ्ठी काढण्यात आली.

चौक परिसरातील चौक, तुपगाव, आसरे,लोधिवली, टेंबरी व वाबंढळ या ग्रामपंचायत कार्यालयात प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम झाला. यातील चौक,लोधीवली, आसरे व तूपगाव येथे प्रशासक राजवट गेली काही महिने सुरू आहे,तर वावंढळ व टेंबरी येथे निवडणुकीला काही महिने बाकी आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून अनेकांनी आपल्या प्रभागात कामकाज सुरू केले होते.

आजच्या प्रभाग रचनेतील आरक्षण मुळे कही खुशी कही गम बघण्यास मिळाला. ओबीसी आरक्षण शिवाय आजची सोडत झाल्याने सर्व साधारण म्हणजे खुल्या गटातील आरक्षण वाढले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

टेंबरी येथे प्रभाग एक मध्य दोन सर्वसाधारण महिला व एक खुला,प्रभाग दोन मद्य अनुसूचित जमाती स्त्री एक,एक खुला जाती प्रवर्ग,एक खुला महिला,प्रभाग तीन येथे एक महिला व सर्वसाधारण पुरुष,प्रभाग चार अनुसूचित महिला व सर्वसाधारण एक महिला,एक पुरुष.ग्रुप ग्रामपंचायत तुपगाव येथे प्रभाग एक मद्य दोन महिला व एक खुला,प्रभाग दोन मद्य अनुसूचित जमाती महिला, एक सर्वसाधारण महिला व खुला प्रवर्ग,प्रभाग तीन येथे दोन महिला एक पुरुष,ग्रुप ग्रामपंचायत वावंढळ प्रभाग क्रमांक एक येथे अनुसूचित जमाती महिला एक,सर्वसाधारण खुला एक व महिला,प्रभाग दोन येथे अनुसूचित जमाती खुला व सर्वसाधारण महिला, प्रभाग तीन एक खुला प्रवर्ग,एक महिला राखीव.ग्रुप ग्रामपंचायत चौक मध्य प्रभाग क्रमांक एक अनुसूचित महिला व एक सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक दोन मद्य एक अनुसूचित जमाती खुला,एक महिला खुला, एक,सर्वसाधारण.प्रभाग तीन,चार व पाच मद्य प्रत्येकी दोन महिला व प्रत्यकी एक साधारण तर.प्रभाग सहा मद्य एक अनुसूचित महिला व दोन खुला.

ग्रुप ग्रामपंचायत लोधीवली येथे प्रभाग क्र. एक अनुसूचित महिला एक व एक सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक दोन मद्य दोन सर्वसाधारण महिला व एक. सर्वसाधारण,प्रभाग.तीन मध्य एक अनुसूचित जाती,एक अनुसूचित जमाती व एक साधारण तर प्रभाग चार अनुसूचित जमाती महिला, सर्व साधारण महिला एक व एक. खुलाप्रवर्ग.तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी किरण पाटील,नितीन परदेशी,मुंडे,प्रशासक शैलेंद्र तांडेल, सचिन कुराडे,संतोष पवार, भाऊसाहेब गोलार,संजय पोळ,अमोल बोराटे, अविनाश गुरले यांनी कामकाज पार पाडले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.