Press "Enter" to skip to content

सईद मुल्ला यांचा ७९ वा वाढदिवस

वृक्षारोपण करून माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांचा जन्मदिवस साजरा

सिटी बेल ∆ पनवेल ∆

पनवेल चे माजी नगराध्यक्ष व सिनियर क्रिकेट टीम पनवेल चे सर्वेसर्वा सईद मुल्ला यांच्या ७९ व्या वाढदिवसानिमित्त आणि जागतिक पर्यावरणाच्या दिनाचे औचित्यसाधुन वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाचा कार्यक्रम पनवेल तालुका क्रीडा केंद्र येथे संपन्न झाला.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सईद मुल्ला म्हणाले की, वृक्षारोपण केल्याने पर्यावरणाचे संतुलन अबाधित राहते. त्यामुळेच आपण ग्लोबल वॉर्मिंग सारख्या महासंकटांवर मात करू शकू. प्रत्येकाने एक तरी झाड लावले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे लावलेले झाड जगविले पाहिजे.

यावेळी सिनियर क्रिकेट टीम च्या सर्व सदस्यांनी केक कापून सईद मुल्ला यांचे अभीष्टचिंतन केले.या कार्यक्रमाला सिनियर क्रिकेट टीमचे कर्णधार भाई सुभाष पाटील, उप कर्णधार प्रमोद पाटील,खजिनदार राजेंद्र पाटील, डॉक्टर ययाती गांधी, डॉक्टर नितीन पोवळे, डॉक्टर रवींद्र राऊत, डॉक्टर सचिन शेठ,सागर आठवणे, अप्पू कुंभार, विकास सलाग्रे , त्रिशुल म्हात्रे, विजय पाटील, सुहास देशमुख, अशोक भगत, सचिन डागरे,संदीप पाटील ,भावेश बिराजदार, महेश पाटकर, जयवंत भोईर, जमदाडे,हेमंत आंबेकर आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.