Press "Enter" to skip to content

रोहा न्यायालयातील न्यायाधीश एस.डी. कमळाकर यांचा निरोप समारंभ संपन्न

सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆

रोहा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील न्यायाधीश एस.डी. कमळाकर यांची चंद्रपूर येथे बदली झाल्याने रोहा बार असोसिएशन तर्फे रोहा न्यायालयात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात न्यायाधीश एस.डी. कमळाकर यांना निरोप देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला रोहा बार असोसिएशनचे अध्यक्ष विधिज्ञ अॅड. नानासाहेब देशमुख, सचिव अॅड. एम.डी.पाटील, अॅड. आर.बी. सावंत, अॅड. सुनील सानप, अॅड. मनोजकुमार शिंदे, अॅड. डी.डी. धारप, अॅड. महेश घायले, अॅड. एस. ए. हाफिज, अॅड. दिनेश वर्मा, अॅड. समीर सानप, अॅड. दिपक सोलंकी, अॅड. अजित दांडेकर, अॅड. प्रवीण दाभाडे, अॅड. महेश पवार, अॅड. संदीप भोसले, अॅड. ओमकार शिलधनकर, अॅड. प्रवीण भोनगे, अॅड. मयुरा मोरे, अॅड. देवयानी मोरे, अॅड. पल्लवी जोशी, अॅड. फाल्गुनी ठक्कर, अॅड. भाग्यश्री मोरे, अॅड. तेजस्वीनी देशमुख, अॅड. श्रुतिका पवार, पेटीशन रायटर मोहन पंडित आदींसह वकील वर्ग व न्यायालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. मनोजकुमार शिंदे यांनी केले. तर विधिज्ञ आर.बी. सावंत, सुनील सानप, दिपक सोलंकी, मयुरा मोरे, पल्लवी जोशी आदिंनी न्यायाधीश एस.डी. कमळाकर यांच्याबद्दल
आपले मनोगत व्यक्त करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी न्यायाधीश एस.डी. कमलाकर यांनी रोहा न्यायालयातील आपल्या आठवणी सांगून येथील वकील वर्गाने आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याचे आवर्जून सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.