कडाव येथे आदिवासी ई-श्रम नोंदणी शिबिर
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
आदिवासी उत्थान सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील कडाव येथे आदिवासी ई-श्रम नोंदणी शिबिर घेण्यात आले.
समता केंद्र सामाजिक शैक्षणिक संस्था कर्जत आणि कष्टकरी मुक्ती संघटना कामगार आयुक्त कार्यालय पनवेल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास तहसीलदार विक्रम देशमुख यांनी उपस्थित राहून मनमोकळे पणें आदिवासी बंधू भगिणी सोबत चर्चा केली. कष्टकरी मुक्ती संघटना मधु पाटील,समता केंद्र कर्जत सचिव स्मिता काळे, समता केंद्र कायदेशीर सल्लागार ॲड कादंबरी काळे, सरपंच अशोक पवार, माजी उपसभापती भीमाबाई पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य किसन पवार तसेच तालुक्यातील तलाठी व मंडळ आधिकरी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या वेळी 230 आदिवासी बांधवांची ई-श्रमकार्ड नोंदणी करण्यात आली.








Be First to Comment