Press "Enter" to skip to content

द्विशतक पार झाल्याने रोहा,धाटाव मधील वातावरण भयभीत

रोह्यात आज कोरोना बाधितांच्या संख्येत १७ रुग्णांची भर

# सिटी बेल लाइव्ह / धाटाव (शशिकांत मोरे) #

    रोह्यात कोरोनाच्या संसर्गाने अक्षरशः सर्वांचीच झोप उडाली असल्याने आज तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाचे १७ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने रोह्यातील बाधितांचि संख्या आता २०२ वर पोहोचली असून द्विशतक पार केले आहे.रोह्यात कोरोनाच्या वाढत्या दोन अंकी आकडेवारी मुळे आता रोहे शहरासह ग्रामीण भागातील वातावरण सुद्धा चांगलेच भयभीत झाल्याचे पहावयास मिळत आहे.
   रोहे शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे.तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोनशेच्या वर जाऊन पोहोचली आहे.आतापर्यंत रोह्यात कोरोना बाधित रुग्णंची संख्या २०२ झाली आहे.आज नोंद झालेल्या नवीन १७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये सुदर्शन कॉलनी रोठखुर्द येथील एकही रुग्ण नसून दत्त महिमा सोसायटी १,अंधार आली मधील १, सुरभी अपार्टमेंट २,रूप निवास खंडोबा मंदिराजवळ २,गणेश नगर वरसे १,आरे बुद्रुक१,वर्धमान रेसिडेन्सी १,पारिजात अपार्टमेंट रायकर पार्क येथील ४,बाळकृष्ण कॉम्प्लेक्स येथील १,संजीवन लाईफ स्टाईल मधील १, v धाविर कृपा १ असे एकूण १७ रुग्ण आज पोसिटिव सापडले आहेत.
रोहा तालुक्यात कालपर्यंत बाधीतांची संख्या १८५ होती.मात्र आता १७ नव्या रुग्णांची भर पडल्याने  कोरोना बाधितांची आता संख्या २०२ वर पोहोचली.यामध्ये औषधोपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ११० असून बरे होऊन डिस्चार्ज मिळालेल्या संख्येत मात्र बर्या पैकी वाढ झाल्याने त्यांची संख्या ९० आहे.
आज कोरोना ग्रस्थांच्य आकडेवारीत १७ रुग्णांच्या पडलेल्या भरिमुळे रुग्णांनी अक्षरशः द्विशतक पार केले आहे.ही वाढती आकडेवारी ग्रामीण भागासह शहरालाही चींताजनक ठरणारी आहे.मात्र ही वाढती रुग्णांची साखळी तोडण्याकरिता आता घरातच राहणे महत्वाचे ठरत असल्याने आता सतर्क राहण्याची गरज आहे असे नागरिकांतून बोलले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.