Press "Enter" to skip to content

वाहतूक कोंडी मुळे घाट रस्ता जाम

माथेरान मध्ये पर्यंटकांची रेकाॅड ब्रेक गर्दी

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानचा पर्यटन हंगामा शेवटच्या टप्प्यात आला आहे, लागून आलेली शनिवार, रविवार ची सुट्टी ने माथेरान मध्ये पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलीआहे, त्यामुळे येथील व्यवसाईक सुखावले आहेत.

गेली दोन वर्ष कोरोना महामारीने सर्व ठिकाणी मंदीचे सावट पसरले होते, त्यात यावर्षी संपूर्ण एप्रिल तसेच अर्धा मे महिन्यात माथेरान मध्ये पर्यटन कमी असल्याने येथील व्यवसाईक चिंतेत होते कारण या शेवटच्या हंगामावर येथील पावसाळी चार महिन्याचे गणित अवलंबून असते परंतु या आठवडय़ात मोठ्या प्रमाणात पर्यटक माथेरानला आल्याने येथील व्यवसाईक मनोमन सुखावले आहेत, त्यातच बोहरा समाजाचे धर्मगुरु शुक्रवारपासून माथेरान मध्ये आल्याने बोहरा समाजाचे लोक सुध्दा माथेरानला मोठ्या प्रमाणात येत आहेत ते बुधवार पर्यत माथेरान मध्येच राहणार असल्याने बोहरा समाज जास्त प्रमाणात माथेरानला येण्याची शक्यता आहे, शनिवार व रविवार दोन दिवसात माथेरान आठ ते दहा हजारा पेक्षा जास्त पर्यटक माथेरानला मध्ये आल्याची माहिती मिळाली आहे.

——– वाहतूकची कोंडी ———
माथेरान मध्ये पर्यटक खाजगी गाड्या घेऊन येणा-यांची संख्या जास्त असल्याने येथील पोलिसांच्या नियोजन शुन्य कारभाराचा फटका येणा-या पर्यटकांना बसत आहे,वाॅटर पाईप स्टेशन पुढे झालेल्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना पर्यटकांची चांगलीच दमछाक झाली त्यांना दोन किलोमीटर अंतर कापण्यासाठी एक ताससाचा कालावधी लागत होता. येथील तिसरा टन वर वाहनांची गर्दी होत असल्याने तेथे वाहतूक नियंत्रण पोलीसांची गरज असल्याचे पर्यटकाकडून बोलले जात आहे, वाहतूक नियंत्रण पोलीस नसल्याने पर्यटकांच्या त्रासात अधिकच भर पङली परणतूनयेथील टॅक्सी चालक अनिल सुर्वे यांनी वाहतूक नियंत्रण पोलीसांची भूमिका बजावून रस्ता सुरळी केला मुळे पर्यटकांना काही अंशी दिलासा मिळाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.