Press "Enter" to skip to content

अखेर पाच वर्षांनी मिळाला न्याय

अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या नराधमास जन्मठेप

सिटी बेल ∆ पनवेल ∆

दि. ३१.०८.२०१७ रोजी खारघर येथील पिडीतेच्या राहत्या घरात घुसून जबरदस्तीने पिडीतेवर बलात्कार करणा-या आणि तिचा गळा दाबून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी जान आलम यांस तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून खारघर पोलीस ठाण येथे गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सदर गुन्हा हा सत्र न्यायालयात दाखल केला असता त्यावर सुनावणीअंती मा. सत्र न्यायालयाने दि. २३.०५.२०२२ रोजी आरोपीस दोषी ठरवून त्यास आजीवन कारावास आणि एकूण दंड रू. २२,०००/- अशी शिक्षा सुनावली.

या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी की, मौजे ओवे, खारघर येथे ८ वर्षीय पिडीत मुलगी तिचे आई-वडील व लहान भावासह राहत होती. तिचे आई-वडील हे कामानिमित्त घराबाहेर गेले असता बाहेरील इसम नामे जान अन्वर आलम हा पिडीतेच्या भरात शिरला आणि पिडीतेचे कपडे वर करून तिच्यावर जबरदस्ती करू लागला. पिडीता आरडाओरड करू लागली असता आरोपीने तिचा गळा दाबुन बेशुध्द केले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर खेळण्याकरिता बाहेर गेलेला पिडीतेचा लहान भाउ घरी परत आला असता त्याने तिला बेशुध्द अवस्थेत पडलेले पाहिले. त्यानंतर तिला शेजारील ओळखीच्या महिलेकडे नेले व तेथून पिडीतेच्या आईला फोन करून बोलाविले. त्यानंतर पिडीतेने सदरचा प्रकार आईला सांगितला आणि त्यानुसार खारघर पोलीस ठाणे येथे फिर्याद नोंद झाली आणि इसम नामे जान अन्वर आलम यावर गुन्हा दाखल झाला खारघर पोलीस ठाणे यांनी सदर गुन्हयाचा तपास पूर्ण करून दोषारोपपत्र मा. सत्र न्यायालयात दाखल केले.

सदरच्या खटल्याची सुनावणी पनवेल येथील मा. अति सत्र न्यायाधीश २ माधुरी आनंद सौ. याच्या न्यायालयात झाली. या प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे अति शासकीय अभियोक्ता यांनी एकुण १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविली सदर केसमध्ये पिडीत मुलगी तिची आई व भाउ, तसेच वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. तपासिक अमलदार, सिमा मुंढे, उपनिरीक्षक, खारघर पोलीस ठाणे याचा तपास महत्वाचा ठरला. सदर प्रकरणामध्ये अति शासकीय अभियोक्ता, प्रतिक्ष वडे-वारंगे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले. तसेच पो ना. / २९९४- सतिश ठाकरे, पो.ह. / २१४४ श्री. सचिन खैरनार, सहा फौजदार श्री. म्हात्रे यांचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाले सरकार पक्षातर्फे अति शासकीय अभियोक्ता, अॅड. प्रतिक्षा वडे-वारंगे यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद आणि दाखल केलेले न्यायनिर्णय ग्राहय धरून मा. अति सत्र न्यायालय २ माधुरी आनंद – दि. २३.०५.२०२२ रोजी आरोपी जान अन्वर आलम वय-२३ वर्षे यास भा. द. वि. कलम ३७६ (२) (आय) (जे), ३०७ तसेच पोक्सो कलम कायदा ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० अन्वये जन्मठेपेची व एकूण रक्कम रू.. २२,००० /- दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

सदर दंडाची पुर्ण रक्कम पिडीत मुलीस देण्यास मा. न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. सदर खटल्याच्या निकालाकडे पनवेल आणि खारघर परिसरातील लोकांचे लक्ष लागून राहिलेले होते..

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.