वी क्लब ऑफ़ न्यू पनवेल स्टील टाऊन संस्थेतर्फे बेंचेसचे उद्घाटन
सिटी बेल ∆ पनवेल ∆ विजयकुमार जंगम ∆
एल आर वेंकटरमण यांचे उपस्थितीत पनवेल रेल्वे स्टेशन येथे १० बेंचेस भेट देऊन त्यांचे उद्घाटन आले. वी क्लब ही एक महिलांच्या द्वारा चालवली जाणारी सामाजिक संस्था असुन ह्या संस्थेने पनवेलकरां करिता वेळोवेळी असे बरेच उपक्रम पार पाडले आहेत.

बेंचेस प्रोजेक्टच्या उद्घाटनास एल आर वेंकटरमण हे विशेष आतिथि म्हणुन उपस्थित होते . स्टेशन मास्टर जे पी मीना, श्री गौतम अग्रवाल, श्री सुनील कुमार व संस्थेचे मान्यवर सदस्य गण पुष्पलता झाम्बरे, नीलम इंदुलकर, मंजू जैन, वीणा चनोडिया, अर्चना जैन, मनीषा ठाकरे, उर्मिला कुमावत, मेघा जैन, श्रुति हूदाली, व संगीता म्हात्रे या ठिकाणी उपस्थित होते.
वी डिस्ट्रिक्ट 323 A2 सेक्रेटरी एक्टिविटी , मंजू जैन ह्यांनी सांगितले कि हा प्रोजेक्ट क्लब ने त्यांचा लाडक्या पास्ट प्रेसिडेंट , स्वर्णलता वी अय्यर ह्यांच्या प्रथम स्मृति दिनास समर्पित केला आहे. प्रवाशांनी आभार मानले आहेत.








Be First to Comment