सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल,गॅस दरवाढी विरोधात रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
रायगड रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार, राज्याच्या राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदीती तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा उमा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कोकण विभागीय महिला राष्ट्रवादी महिलाध्यक्षा अर्चना घारे यांच्या उपस्थितीत रोहा तालुक्यामध्ये केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल,गॅस दरवाढी विरोधात रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवती संघटनेच्या अध्यक्षा सायली दळवी, कर्जत तालुकाध्यक्ष रंजना धुळे, रोहा तालुकाध्यक्ष प्रीतम पाटील, सुधागड तालुकाध्यक्षा रूपाली भणगे, मुरुड तालुकाध्यक्ष मृणाल खोत, खालापूर तालुकाध्यक्ष श्वेता मनवे, माणगाव तालुका अध्यक्ष संगीता बक्कम, श्रीवर्धन तालुकाध्यक्ष ज्योती पारकर, म्हसळा तालुकाध्यक्ष रेश्मा कानसे, महाड तालुकाध्यक्ष सुप्रिया देशमुख, तालुकाध्यक्ष हेमांगी पाटील, त्याच बरोबर रोहा शहराध्यक्ष प्राजक्ता चव्हाण, पेण शहराध्यक्ष सुचिता चव्हाण, मुरुड शहराध्यक्षा प्रतिभा माळी, महाड शहराध्यक्ष जानवी विचारे, खोपोली शहराध्यक्ष सुवर्णा मोरे, वसांबे विभागीय अध्यक्षा वर्षा पाटील, पंचायत समिती वसांबे अध्यक्षा माया खाणे, मुस्कान झटाम, वंदना थोरवे आदी उपस्थित होत्या.








Be First to Comment