सिटी बेल च्या दणक्याने नागोठणे गांधी चौकातील काम झाले पुर्ण
सिटी बेल ∆ नागोठणे ∆ प्रतिनिधी ∆
नागोठणे गांधी चौकात अनेक दिवसापासून पाणीपुरवठा होणारी पाईप लाईन रस्त्याच्या आतील बाजूने फुटल्याने गांधी चौकात मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया जात असे. त्या परिसरात पाणी साचत असे त्यामुळे ठिकाणी तलावाचे स्वरूप बनले होते.
स्थानिक ग्रामस्थ हे अनेक दिवसांपासून संताप व्यक्त करीत होते. त्या परिस्थितीचा आढावा सिटी बेलचे पत्रकार याकूब सय्यद यांनी सिटी बेल या न्युज पोर्टल बातमी प्रसिद्धी होताच दुसऱ्याच दिवशी नागोठणे ग्रामपंचायतीने त्वरित बातमीची दखल घेवून कामाला सुरुवात केली.

खरी परिस्थिती पहाता गांधी चौकातील स्थानिक ग्रामस्थ अरूण गुरव, प्रदिप धुरवे, सौ.निलीमा दफतेदार, राजा गुरव तसेच इतर ग्रामस्थांनी नागोठणे ग्रामपंचायतीचे व पत्रकार याकूब सय्यद यांचे मनापासुन आभार मानले.








Be First to Comment