Press "Enter" to skip to content

नागोठण्यातील गांधी चौकाला तलावाचे स्वरूप

सिटी बेल ∆ याकूब सय्यद ∆ नागोठणे ∆

नागोठणे येथील गांधी चौकात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे येथे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

अनेक दिवसांपासून गांधी चौक या ठिकाणी नळ पाणी पुरवठा पाईप लाईन फुटल्यामुळे त्या पाईपातील सर्व पाणी रस्त्यावर साचत आहे. रस्त्यावरून पदचारी जात असताना मोटरस्वार तसेच चार चाकी वाहन चालकांना त्या पाणी चा विसर पडत असल्याने वेगवान वाहन त्या ठिकाणावरून घेऊन जात असताना पदचार्यांच्या अंगावर पाणी उडत आहे. त्यामुळे भांडण तंटा होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

त्या वार्डातील लोकप्रतिनिधी सदस्य यांनी या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे असे मत स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. परंतु त्या सदस्यांचा त्या परिस्थिती कडे लक्ष दिसत नसून नागोठणे ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी तरी त्या परिस्थितीकडे लक्ष केंद्रित करून रस्त्यावरून पदचारी जात असताना त्यांना होत असलेला त्रास दूर करावा अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होता आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.