मुंबई – गोवा महामार्गाला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्याची मागणी
सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆
कोकणची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आद्य पत्रकार, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी रायगड प्रेस क्लबच्या वतीने,जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे
मुंबई – गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्या अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल चे तहसीलदार सचिन सैजाळ यांच्याकडे देण्याचे आले यावेळी रायगड प्रेस क्लब अध्यक्ष भारत रांजणकर,मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, मुरूड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अमूलकुमार जैन ,अलिबाग प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर महेंद्र दुसार आदीजण उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली
पत्रकारांनी सातत्यानं दहा वर्षे रस्त्यावर उतरून लढा दिल्यानंतर आणि दिल्लीपर्यंत पाठपुरावा केल्यानंतर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. काम रखडल्यानंतर देखील वेळोवेळी पत्रकारांनी पाठपुरावा केला होता. पत्रकार लढत होते तेव्हा सर्व राजकीय पक्ष मूग गिळून गप्प होते. मात्र आता रस्त्याचे काम पूर्णत्वास येत असताना अनेक नेते श्रेय लाटण्यासाठी समोर येत आहेत तसेच काहींनी महामार्गासाठी वेगवेगळी नावं सूचवून मोडता घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आद्य पत्रकार आचार्य
बाळशास्त्री जांभेकर हे कोकणचे सुपूत्र आहेत आणि पत्रकारांमुळे हा महामार्ग होत असल्याने बाळशास्त्रींचे महामार्गाला नाव देणे औचित्यपूर्ण ठरणार असल्याने सरकारने तातडीने तसा निर्णय घ्यावा अशी मागणी आम्ही कोकणातील सर्व पत्रकार करीत आहोत.

विविध प्रकल्पांना राजकीय नेत्यांची नावं दिली जात असतात. मुंबई – गोवा महामार्गाला एक पत्रकार, विचारवंत, समाजसुधारक असलेल्या बाळशास्त्रींचे नाव देऊन औचित्य साधावे अशी भावना राज्यातील पत्रकारांची आहे.
मुंबई – गोवा महामार्गाला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी कोकणातल्या तीनही जिल्ह्यातील पत्रकार तालुका पातळीवर तहसिलदारांना निवेदने देण्यात आली.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला आद्य शास्त्री बाळ जांभेकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी रायगड प्रेस क्लबच्या वतीने तहसीलदार (महसूल) सचिन सैजाल यांना निवेदन देताना रायगड प्रेस क्लब अध्यक्ष भारत रांजणकर,मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी, मुरूड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अमूलकुमार जैन ,अलिबाग प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर , महेंद्र दुसार आदीजण उपस्थित होते.








Be First to Comment