Press "Enter" to skip to content

रणरणत्या उन्हात,पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

रणरणत्या उन्हाची तमा न बाळगता शेतकरी शेतीच्या कामामध्ये मग्न झाले आहे.पावसाला सुरु झाला कि शेतीची कामे करता येत नाही.यामुळे शेतातील बांध बंधीस्ती करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी शेतीच्या कामासाठी सज्य झाला आहे.

मे महिन्यात लग्नाच्या तिथी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतीची कामे खोलंबली होती.मात्र आता कामाची लगबग जोरात सुरु झाल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे.शेतामध्ये सपाटीकरण, नांगरणी, वखरणे, काडीकचरा वेचणे, बांधवारील झाडांची छाटण करणे, शेणखत पसरविणे, गवत जाळणे ,राब भाजणे. इ. कामे पूर्ण करण्यासाठी शेतक-यांची धावपळ सुरु झाली आहे.

रणरणत्या उन्हामध्ये शेतीच्या कामासाठी शेतमजूर मिळत नसल्याने घरातील कुटुंब घेऊन कामे केली जात आहे.परंपरागत बदलत्या काळानुसार वेळेची बचत म्हणून सर्व शेतीची कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने करतांना दिसत आहे.परंतू अजूनही काही ग्रामीण भागातील गरीब शेतकरी लाकडी नांगरानेच शेतीची मशागत करतांना दिसत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.