Press "Enter" to skip to content

खालापूर प्रेस क्लबने दिले तहसीलदार यांना निवेदन

मुंबई – गोवा महामार्गाला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे याची केली मागणी

सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆
पाताळगंगा ∆

कोकणची लाइफलाइन असलेल्या मुंबई – गोवा महामार्गाला आद्य पत्रकार तथा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे या मागणीसाठी कोकणातील सर्व तालुक्यातील पत्रकारांनी स्थानिक पातळीवर तहसिलदारांना निवेदन देऊन आपली भूमिका अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मांडली असून खालापूर प्रेस क्लबने ही खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांना या आशयाचे निवेदन पत्र देत मुंबई – गोवा महामार्गाला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.

यावेळी जेष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ, खालापूर प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे, सचिव रविंद्र मोरे, खजिनदार मुकुंद बेंबडे, प्रसिद्धीप्रमुख समाधान दिसले, सहसचिव राज साळुंखे, सदस्य नवज्योत पिंगळे आदी उपस्थित होते.

पत्रकारांनी सातत्यानं सहा वर्षे रस्त्यावर उतरून लढा दिल्यानंतर आणि दिल्लीपर्यंत पाठपुरावा केल्यानंतर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. काम रखडल्यानंतर देखील वेळोवेळी पत्रकारांनी पाठपुरावा करित पत्रकार लढत होते तेव्हा सर्व राजकीय पक्ष मूग गिळून गप्प होते, मात्र आता रस्त्याचे काम पूर्णत्वास येत असताना अनेक नेते श्रेय लाटण्यासाठी समोर येत आहेत तसेच काहींनी महामार्गासाठी वेगवेगळी नावं सूचवून मोडता घालण्याचा प्रयत्न सुरू केल्याबद्दल एस.एम. देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच बाळशास्त्री जांभेकर हे कोकणचे सुपूत्र आहेत आणि पत्रकारांमुळे हा महामार्ग होत असल्याने बाळशास्त्रींचे महामार्गाला नाव देणे औचित्यपूर्ण ठरणार असल्याने सरकारने तातडीने तसा निर्णय घ्यावा अशी मागणी एस.एम देशमुख यांनी केली असून शासनाचे पुन्हा लक्ष केंद्रीत व्हावे यासाठी संपूर्ण कोकणातील पत्रकारांनी स्थानिक पातळीवर तहसिलदारांना निवेदन देऊन या मार्गाला मुंबई – गोवा महामार्गाला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्याची मागणी केली असून याच अनुषंगाने खालापूर प्रेस क्लबने तहसिलदारांना निवेदन देऊन आपली भूमिका अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांना निवेदन पत्र दिले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.