सिटी बेल • रसायनी • प्रतिनिधी •
रसायनी पाताळगंगा परिसरातील वासांबे मोहोपाडा हि सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे.या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी असणारे श्वेता संजय कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पद रिक्त झाले होते.या उपसरपंच पदाची निवडणूक बुधवार दि.11 रोजी दुपारी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या शिवांजली इमारतीत पार पडली.यावेळी उपसरपंच पदासाठी काॅंग्रेस आयच्या माधुरी भगवान जांभळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता .
यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी सचिन कुराडे यांनी काम पाहिले.तर उपसरपंचपदाची निवडणूक सरपंच ताई पुंडलिक पवार यांच्या उपस्थितीत पार पडली.
उपसरपंचपदी माधुरी भगवान जांभळे यांची बिनविरोध निवड होताच माजी महिला व बालकल्याण सभापती उमाताई मुंढे,माजी सभापती कांचन पारंगे ,युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निखिल डवले, जिल्हा उपाध्यक्ष सागर सुखदरे,माजी सरपंच संदिप मुंढे, माजी सरपंच कृष्णा पारंगे, माजी सरपंच अशोक मुंढे, देविदास म्हात्रे,,संजय कांबळे, माजी उपसरपंच दत्ता शिंदे, माजी उपसरपंच राकेश खारकर , सदस्य जयराम पाटील ,मिनाश्री मंगेश पाटील आदींसह इतर ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

दरम्यान उपसरपंचपदी माधुरी भगवान जांभळे यांची निवड होताच ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर जमलेल्या त्यांच्या चाहत्यांनी फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.यावेळी मोहोपाडा ग्रामपंचायत ते शिवाजी चौक अशी वाजत-गाजत मिरवणुक काढण्यात आली.यानंतर पुन्हा रिस थांबा ते जांभळे यांच्या घरापर्यंत वाजत-गाजत उपसरपंच माधुरी भगवान जांभळे यांची मिरवणूक पार पडली.यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित उपसरपंच माधुरी भगवान जांभळे यांना शुभेच्छा दिल्या.








Be First to Comment