Press "Enter" to skip to content

तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची सभा

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

खालापूर तालुक्याचे तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची सभा रघुनाथ (भाई) शिंदे यांचे अध्यक्षतेखाली व आयुब तांबोळी तहसीलदार खालापूर सदस्य सचिव याच्या उपस्थितीत सरनौबत नेताजी पालकर सभागृह खालापूर येथे संपन्न झाली.

सदर सभेस तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचे सदस्य उपस्थित होते.यात १) संतोष गणेश बैलमारे, २) अजित गजानन देशमुख, ३) संजय चिमणराव देशमुख ४) संतोष विठू शेलार, ५) कृष्णा गंगाराम पारंगे, ६) श्रीम, ज्योती संतोष सकपाळ, ७) श्रीम. मंदा भोसले सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष व सर्व सदस्य यांचे तहसीलदार यांनी भारताचे संविधान पुस्तक व गुच्छ देऊन सर्वाचे स्वागत केले.

अध्यक्ष तसेच सदस्य यांनी समन्वय व पुनर्विलोकन समितीबाबत कार्यपद्धती उपस्थित कार्यालयीन प्रमुख यांना माहिती देण्यात आली. खालापूर तालुक्यातील गोरगरिब जनतेचे प्रश्न सोडविण्याबाबत तसेच खालापूर तालुक्यात कारखाण्यात काम करणारे कामगाराबाबत किमान वेतन, ज्या भागात पाणी टंचाई आहे त्या भागात तातडीने टँकर तातडीने पुरविण्यात यावे, ग्रामीण भागात एस. टी. सेवा पोहचत नाही त्या भागात एस. टी. सेवा देण्यात यावी. जेथे रस्त्या लगत शाळा आहेत, त्या रस्त्याना गतीरोधक बसविण्यात यावे, पावसाळा जवळ आल्याने पावसाळा अंती कामे पूर्ण करावी, रस्त्यावर झाडे झुडपे वाढलेली आहेत त्या ठिकाणी झाडांची तोडण्यात यावी, पावसाळा अंती तलावातील गाळ काढण्यात यावे आरोग्य विभागा मार्फत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंशचे इजेक्सन ठेवण्यात यावे. इत्यादी कामाबाबत सविस्तर चर्चा करुन पुढील सभेपुर्वी सदरचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत सांगण्यात आले.

सदर सभेस खालापूर तालुक्यातील शासकीय/निमशासकीय कार्यालयाचे प्रमुख असे एकूण ३६ कार्यालयाचे प्रमुख यांना सभेसाठी निमंत्रित करण्यात आले होते. परंतु सदर सभेस एकूण ३० शासकीय/निमशासकीय कार्यालय प्रमुख उपस्थित होते व त्यापैकी काही शासकीय/निमशासकीय कार्यालय प्रमुख उपस्थित न राहता प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे अध्यक्षानी तिव्र नाराजी व्यक्त करुन गैरहजर राहिलेल्या कार्यालयीन प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस काढून त्यांचा खुलासा सादर करण्याबाबत अध्यक्ष यांनी सांगितले.

तहसीलदार खालापूर यांनी सदर बैठकीस हजर राहिलेले सर्व अध्यक्ष, सदस्य तसेच सर्व खात्याच्या अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहिल्याने सर्वाचे आभार मानून अध्यक्षांच्या वतीने सभा समाप्त झाल्याचे जाहीर केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.