Press "Enter" to skip to content

विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन

सरपंच ताई पवार यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई पुंडलिक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले.यावेळी विविध विकासकामांचे उदघाटन तर काही कामांचे भूमीपूजन करण्यात आले.

सरपंच ताईं पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोहोपाडावाडीतील लहानग्या मुलांना खेळण्यासाठी ग्रामपंचायत निधीतून वाडीच्या प्रवेशद्वाराजवळ खेळण्यांच्या साहित्य संचाचे उद्घाटन श्रीमती विमल पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

सायंकाळी परिसरात अंधाराचे साम्राज्य असल्याने सरपंच ताई पवार यांनी मोहोपाडा वाडी,खोंडावाडी व पानशिल येथे हायमास्ट उभारला या कामाचे उद्घाटन सरपंच ताईं पवार, माजी सरपंच संदिप मुंढे व ग्रामपंचायत सदस्य जयराम पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मोहोपाडा आदीवासीवाडीत पाच हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मोहोपाडा मुख्य बाजारपेठेत कचरा साठवण करण्यासाठी ग्रामपंचायत निधीतून शंभर प्लास्टिक डस्टबिन देण्यात आले.तसेच आदीवासीवाडीत सभामंडपाचे भूमीपूजन करण्यात आले.

यावेळी सरपंच ताई पुंडलिक पवार, उपसरपंच श्वेता कांबळे,माजी पंचायत समिती सभापती कांचन पारंगे,माजी सरपंच संदिप मुंढे,माजी सरपंच भाग्यश्री पवार, ग्रामपंचायत सदस्य संतोष मैदर्गींकर, जयराम पाटील, ग्रामपंचायत इंजिनिअर उत्तम माळी, सदस्य भाग्यश्री जांभळे,विमल पवार, पुंडलिक पवार, विठ्ठल वाघमारे, मिना वाघमारे, भगवान वाघमारे, प्रकाश पवार, सचिन पवार, किशोर पवार आदी उपस्थित होते.

मोहोपाडा आदीवासी वाडीत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविल्याने सरपंच ताई पवार यांचे आदीवासी बांधवांनी आभार मानून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन संतोष चौधरी यांनी पाहिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.